होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जिल्हा बँक निवडणुकीवरून विकासोतील वातावरण तापले, पळासखेडे रुपनगर येथे पोलीस बंदोबस्तात अधिकाराचा ठराव

On: August 26, 2026 4:41 PM
Follow Us:
---Advertisement---

भडगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक जळगाव या संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायटीमार्फत मतदानाचा अधिकार देण्यासाठी पळासखेडे रुपनगर विकासोमध्येही तीन दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. परंतु आज झालेल्या सभेत तेरा विरुद्ध सात असा बहुमताचा ठराव कडक पोलीस बंदोबस्तात पारीत करण्यात आला. विकासोचे नियमित कर्ज फेड करणारे सभासद प्रेमराज सूर्यभान पवार यांच्या नावाचा ठराव वादळी चर्चेनंतर पारीत करण्यात आला.

 

​जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक जाहीर झाल्यापासून ठराव मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे विकासोचे काही सदस्य सहलीला गेल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पळासखेडे रुपनगर विविध कार्यकारी सोसायटीची कर्ज वसुली 100 टक्के नसल्यामुळे निवडून आलेल्या सभासदांना मतदानासाठी त्यांच्या नावाचा ठराव करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे नियमित कर्ज फेड करणाऱ्या सभासदाच्या नावाचा ठराव करून मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो. त्यामुळे येथे रस्सीखेच सुरू झाली व काही सदस्य सहलीला गेले. विकासोत तेरा सदस्य आहेत. त्यातील बारा सदस्य सभेला हजर होते.

 

​यावेळी चेअरमन प्रमोद कृष्णा पाटील, संचालक शरद पाटील, ज्ञानेश्वर राजपूत, ताराचंद पवार, पांडुरंग जाधव, धनंजय पवार, संगीताबाई पाटील, सखूबाई पाटील, दीपक मोरे, राहुल पाटील, हरी वंजारी आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव संतोष चंदले यांनी काम पाहिले तर त्यांना संस्थेचे शिपाई लक्ष्मण पाटील यांनी सहकार्य केले.

दरम्यान, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या उपस्थितीत पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप परदेशी, संजय पाटील, सुनील राजपूत, दीपक पाटील, सोनी सपकळे, होमगार्ड समाधान देशमुख, अजय पाटील, किशोर पाटील, रवींद्र महाजन, शरद काळे, युवराज राठोड व पोलीस पाटील ज्ञानेश्वर कोळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment