होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

माहेश्वरी चोपडेची पंजाबमधील बॉक्सिंग चाचणीसाठी निवड

On: August 13, 2026 3:18 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनतर्फे भद्रावती, चंद्रपूर येथे इंटर क्लब युथ (U-19) मुले व मुलींची महाराष्ट्र राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेत जळगावची कु. माहेश्वरी दिनेश चोपडे हिने 70 ते 75 किलो वजनगटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या जोरावर तिची महाराष्ट्र बॉक्सिंग संघात निवड झाली असून, आता ती पटियाला येथे होणाऱ्या भारतीय संघाच्या निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे युथतर्फे मुले व मुलींच्या भारतीय बॉक्सिंग संघासाठी निवड चाचणी स्पर्धा 27 ते 31 ऑगस्टदरम्यान पटियालातील पंजाब येथे होणार आहे. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या खेळाडूंना जकार्ता, इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

माहेश्वरी सध्या अकोला येथील महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी केंद्रात सराव करत आहे. तिला जळगाव येथील खेलो इंडिया बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निलेश बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. माहेश्वरी चोपडेच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, बॉक्सिंग पदाधिकारी डॉ. अमोल पाटील, धनराज कसाट, नरेंद्र मोरे, नयन राणे, रोहिदास पाटील, विशाल बाविस्कर, चुनिलाल गुप्ता, दीपक वाल्डे, रवी नरवाडे आणि संतोष सुरवाडे यांनी अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रसाद सोनवणे याची ४० व्या ज्यु. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या चार खेळाडूंची निवड; विवेकानंद महाविद्यालयातील या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव

छत्रपती चषक अंतिम सामना: अटीतटीच्या लढतीत धानोरा संघाने पटकावला ‘छत्रपती चषक’; चोपडा छत्रपती शिवाजी महाराज संघ ठरला उपविजेता

इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस कर्णधार; आणखी कोणाची निवड झाली “ते” जाणून घ्या

IPL Mega Clash:’आरसीबी’समोर विजेतेपद कायम ठेवण्याचे आव्हान; गुजरात टायटन आरसीबीला रोखणार का?

सुरगाण्यातील सातबाभळच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘वानखेडे’चा थरार

Leave a Comment