होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विकासाचा दावा करणाऱ्या भाजपाला नगरसेवकाचा घरचा आहेर! मूलभूत सुविधांसाठी सत्ताधारी नगरसेवक विजय बांदल यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा

On: August 19, 2026 4:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: शहरातील कला वसंत नगर (वार्ड क्र.2) भागातील प्रलंबित समस्या आणि मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक आक्रमक झाले. बुधवार, 19 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी नगरसेवक विजय बांदल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी वार्ड क्र. 2 मधील महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने महापालिका प्रशासन व महापौरांची भेट घेऊन नागरी समस्यांसंदर्भात आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.

जळगाव शहरातील कला वसंत नगर भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या संदर्भात यापूवही अनेकदा निवेदने देऊन प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर नगरसेवक विजय बांदल यांच्या नेतृत्वात नागरिकांनी थेट महापालिका गाठत प्रशासनाला जाब विचारला.

सुविधा मिळत नसताना कर कशासाठी आकारला जातो, असा सवाल करत नागरिकांनी घरपट्टीत सवलत मागितली होती. मात्र प्रशासनाने सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला. मनपाच्या नियमांचा आदर राखत नागरिकांनी नियमित घरपट्टी भरली असून, दिलेल्या निवेदनासोबत घरपट्टी भरल्याच्या साक्षांकित प्रतीही जोडल्या आहेत.

सुविधा देऊ शकत नसल्यास तसे लेखी लिहून द्या!

वर्षानुवर्षे कर भरूनही नागरीसुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी तसेच मनपा प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे जर महापालिका रहिवाशांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवू शकत नसेल, तर त्यांनी आम्ही सुविधा पुरवण्यास असमर्थ आहोत असे अधिकृत लेखी लिहून द्यावे, अशी आक्रमक भूमिका नगरसेवक विजय बांदल व नागरिकांनी निवेदनाद्वारे मांडली.

यावेळी आयुक्त व महापौरांनी निवेदनाचा स्वीकार करत वार्ड क्र. 2 मधील समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले. या धडक मोर्चात कला वसंत नगरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घरपट्टी पूर्ण, सुविधा मात्र शून्य

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कला वसंत नगर भागात पिण्याचे पाणी, पक्के रस्ते, गटारी, नियमित स्वच्छता कर्मचारी, कचरा संकलनाची घंटागाडी आणि रात्रीच्या सुरक्षेसाठी पथदिवे (स्ट्रीट लाईट्स) यांसारख्या प्राथमिक सोयी-सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. असे असूनही महापालिकेकडून नियमितपणे घरपट्टीची वसुली केली जात आहे.

सत्ताधारी भाजपला घरचा आहेर

जळगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचा दावा सत्ताधारी भाजपाकडून सातत्याने केला जातो. मात्र, शहरातील अनेक भागात मुलभूत सुविधा देखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. असे असताना देखील सत्ताधारी स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. मात्र, आजच्या या आंदोलनातून सत्ताधारी भाजपाला त्यांच्यास पक्षातील नगरसेवक विजय बांदल यांनी मोर्चाच्या माध्यमातून आरसा दाखविला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment