होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अमळनेर पोलिसांची धडक कारवाई: अवैध धंद्यांवर धाडी, कोंबिंग ऑपरेशनद्वारे गावठी पिस्टल, तलवारी जप्त

On: July 30, 2026 4:04 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगावमध्ये अवैध धंदे चालक आणि गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीस सरसावले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमळनेर पोलिसांनी शहर व परिसरात व्यापक कोंबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांवर धडक कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळ्या आहे. या पोलीस कारवाईत शस्त्रे जप्त करण्यासह दारूबंदी, जुगार, वाहतूक नियमभंग आणि प्रलंबित वॉरंट बजावणीपर्यंत कारवायाचा समावेश आहे. दरम्यान दारूबंदी आणि जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या कोंबिंग ऑपरेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर पोलीस ठाण्याचे सात अधिकारी व अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी- कर्मचारी ही सहभागी झाले होते. या कारवाई दरम्यान शस्त्रास्त्र कायदयांर्गत पिस्तूल आणि तलवार बाळगल्याप्रकरणी आणखी दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. दारूबंदी कायद्यांतर्गत नऊ, तर जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पाच गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या शंभरहून अधिक संशयितांची चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. तसेच पंचवीस हिस्ट्रीशीटरांची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ३२ जणांवर मुंबई पोलीस कायदा अन्वये कारवाई झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment