State Water Dam Position: अल निनोचा परिणाम वातावरणात पहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी अद्याप दमदार पाऊस न झाल्याने पाण्याच्या साठ्यात घट होतांना दिसून येत आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने दैनंदिन पाणीसाठ्याची आकडेवारी जारी केली आहे. राज्यातील सर्व धरण प्रकल्पात पाणीसाठा घटला आहे. राज्यात एकूण मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प, असे एकूण ३०२९ धरणे आहेत. धरण प्रकल्पात एकूण ४८५८७.०२ (द.ल.घ.मी) इतका पाणीसाठा आहे. तर त्यामध्ये आजचा उपयुक्त साठा हा ३२५९२.१८ (द.ल.घ.मी) इतका जलसाठा आहे. म्हणजेच सर्व धरणात यंदा ६० टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजच्या दिवशी पाणीसाठा हा ६८.५५ टक्के इतका होता. त्यामुळे राज्यातील धरण प्रकल्पात पाण्याची घट दिसून येत आहे. एकूण ही घट ८.५५ टक्के इतकी दिसून येत आहे. जलसंपदाच्या दैनंदिन आकडेवारी वरून परिस्थिती चिंताजनक दिसून येत आहे.
पुणे, कोकण प्रकल्पात समाधानकारक साठा
राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या मोठ्या , मध्यम आणि लहान धरण प्रकल्पातील जलसाठ्यात कमालीची घट दिसून येत आहे. एकूण १३८ मोठे धरण प्रकल्प आहे. त्यात ६९.४३ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी ७६. १२ टक्के जलसाठा होता. मध्यम प्रकल्पात ही २६४ धरणात केवळ ४८. ४८ टक्के इतकाच साठा आहे. गतवर्षी ६०.१९ टक्के साठा होता. लघु प्रकल्पाची अवस्था यापेक्षा बिकट आहे. एकूण २६२७ लघु प्रकल्प धरणात केवळ ३१.४० टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी ४०.०३ इतका होता. त्यामुळे राज्यातील धरण क्षेत्रात सध्या पाण्याचा साठा हा चिंताजनक आहे, असे म्हणता येईल. या धरण क्षेत्रात पाऊस झाला नाही, तर पाण्याची परिस्थिती बिकट होईल, असे सध्या दिसत आहे.

अमरावतीत सर्वात कमी
पुणे आणि कोकण परिक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा दिसून येत आहे. पुणे प्रकल्पात धरण प्रकल्पात ७५.९१ % आणि कोकण धरण प्रकल्पात ८२.५७ % समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वात कमी पाणी साठा हा अमरावती जिल्ह्यात ४३.२० टक्के इतकाच जलसाठा आहे ही चिंतेची बाब आहे, आता जुलै महिना संपत आला आहे. परंतु पावसाचा बहुतेक भागात पत्ता नाही. काही घाटमाथा [परिसर सोडला तर मुसळधार पावसाची महाराष्ट्राला गरज आहे.
महाराष्ट्रातील सर्व धरण प्रकल्पातील जलसाठा टक्केवारी
(आजचा आणि गतवर्षी)
१) नागपूर ४८.८९ % ५६.६१ %
२ )अमरावती ४३.२० % ५४.८८ %
३)छत्रपती संभाजीनगर ३४.०५ % ५३.१८ %
४) नाशिक ६२.९३ % ६३.५३ %
५) पुणे ७५.९१ % ८१.४१ %
६) कोकण ८२.५७ % ८३.७९ %
एकूण महाराष्ट्रातील धरण प्रकल्पातील आजचा आणि गतवर्षीचा पाणीसाठा ६०.८६ % ६८.५५ %










