होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

हवामान स्थिती: पालघरसह नाशिक-पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट; तर, जळगावलाही मध्यम पाऊस

On: July 23, 2026 12:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather Update: पालघरसह नाशिक, पुणे घाटमाथा परिसराला आज गुरुवार रेड अलर्ट देण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे घाटमाथा परिसरात नागरिकांना पर्यटन करतांना काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच या परिसरात कधी कधी ताशी ६० ते ७० किमी वेगाचे जोरदार वारे वाहणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. जळगाव, धुळे नाशिक, नंदुरबार या ठिकाणी ही येलो अलर्ट दिला आहे. येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याचे वारे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहणार आहे.

राज्यात आज गुरुवारी आणि उद्या शुक्रवारी असे दोन दिवस मुसळधार ते अति-मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर पुढील तीन दिवस २५ ते २७ जुलै रोजी ग्रीन अलर्ट दिला असून हलका किंवा मध्यम सरी बरसणार आहे. दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांना पावसाचा इशारा दिला आहे. विशेतः पालघरसह नाशिक आणि पुणे घाटमाथा परिसराला रेड अलर्ट असून ठाणे, मुबई, रागयडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला. काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची दाट शक्यता. यावेळी ६० ते ७० किमी तास वेगाचे जोरदार वारे अधून-मधून वाहण्याची दाट शक्यता आहे.

शुक्रवारी पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल. तसेच राज्यात १७ ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका आणि मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment