होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

RBI on Inflation: सर्वसामान्यांच्या खिशाला चटका! दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा इशारा

On: August 5, 2026 2:05 PM
Follow Us:
---Advertisement---

RBI Repo Rate News: देशात महागाई झपाट्याने वाढत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहे. अशात चिंतेत भर टाकणारी अकडेवारी समोर आली आहे. भारतीय रिजर्व बँक म्हणजेच RBI ने आपल्या ऑगस्ट 2026 च्या मॉनिटरी पॉलिसी बैठकीत देशाची अर्थव्यवस्था, GDP आणि महागाई संदर्भात नवे आकडे जारी केले आहे. सोमवार 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या बैठकीत समितीने रेपो दर 5.25% इतका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, येणाऱ्या काळात महागाईचा भडका उडण्याचा इशारा देखील RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिला आहे.

 

या वर्षात महागाई कशी असेल?

 

RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महागाईचा दर अपेक्षेपेक्षा कमी राहिला. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठा साखळीवरील दबावामुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी महागाई दर हा अपेक्षित दरापेक्षा जास्त राहणार आहे. महागाई वाढणार असली तरी देशाची GDP मध्ये याच काळात वाढ दिसून येणार आहे.

त्यांच्या मते, महागाई आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत उच्चांक गाठू शकते. त्यानंतर महागाईचा वेग कमी होण्याची अपेक्षा आहे. पुरवठा साखळीवरील अडचणी अद्याप कायम असून, त्यामुळे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये आर्थिक वाढ अपेक्षेपेक्षा मंदावण्याचे संकेतही त्यांनी दिले.

तर आर्थिक वर्ष 2027 मध्ये सरासरी महागाई दर हा 5.0% च्या वर असणार आहे म्हणजेच RBI च्या अनुमानानुसार या पूर्ण वित्तीय वर्षात महागाई दर 4% पेक्षा वर राहणार आहे. तसेच कोअर महागाई दर 4.3% असणार असल्याचा अनुमान आहे.

 

दिवाळीत महागाईचा चटका

या आर्थिक वर्षाची तिसरी तिमाही ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांत असेल. यात नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे RBI नुसार या काळात महागाई दर 5.9 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसेल. अन्नधान्य आणि इंधनाच्या किमती वाढल्यामुळे महागाईत ही वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, कोअर महागाई अद्याप स्थिर असल्याने अर्थव्यवस्थेवरील एकूण महागाईचा दबाव मर्यादित असल्याचे RBI ने स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; सोन्याची चमक पडली फिकी, वायदे बाजारभाव १.५ लाखांवर पोहोचले

New Rules From September: १ सप्टेंबरपासून बदलणार हे ५ नियम; तुमच्या खिशावर त्याचा किती परिमाण होतो ‘ते’ जाणून घ्या

जळगावच्या ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करा: उद्योगमंत्री डॉ. सामंत यांचे निर्देश

मोठी बातमी: येत्या काही दिवसांत साखरेच्या किरकोळ किंमती कमी होण्याची शक्यता, उद्योग संघटना ‘आयएसएमए’चे मत

सॅमसंगच्या ग्राहकांसाठी खुशखबर: गॅलेक्सी एस २६ एफई (Galaxy S26 FE) ऑगस्टच्या शेवटच्या आठोवड्यात होणार लॉन्च

Leave a Comment