होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महापालिकेची कारवाई: थकीत भाड्यापोटी नेहरू चौकतील दोन दुकाने सील

On: August 21, 2026 11:48 AM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: धुळे महानगरपालिकेच्या मालकीच्या नेहरू चौक येथील दुकानांचे थकीत भाडे वसुलीसाठी महानगरपालिकेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत आज थकीत भाडे असलेली दोन दुकाने सील करण्यात आली. नेहरू चौक, सहा नंबर १७ येथील दुकान क्रमांक २० चे धारक विवेक मधुसूदन बिरारी यांच्याकडे सन २०२२ ते २०२५ या कालावधीतील २ लाख २२ हजार ५८१ रुपये थकीत भाडे तसेच ७ हजार ८३० रुपये अनामत रक्कम, अशी एकूण २ लाख ३० हजार ४११ रुपये थकीत रक्कम होती. त्यामुळे सदर दुकान आज, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सील करण्यात आले.

तसेच नेहरू चौक, सहा नंबर १७ येथील दुकान क्रमांक १३ चे धारक अली शेर अद्रीस शेख यांच्याकडे सन २०२२ ते २०२५ या कालावधीतील २ लाख ३० हजार ८०६ रुपये थकीत भाडे व ८ हजार १०० रुपये अनामत रक्कम, अशी एकूण २ लाख ३८ हजार ९०६ रुपये थकीत रक्कम होती. त्यामुळे सदर दुकानही सील करण्यात आले.

ही कारवाई महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक आयुक्त सोनाली देवरे-पगार, बाजार विभाग प्रमुख सूर्यकांत हजारे, वरिष्ठ सहाय्यक प्रकाश कातेपुरी, लिपिक दानिश अन्सारी व शिपाई इफ्तेखार शेख यांनी सहभाग घेतला. महानगरपालिकेच्या मालकीच्या दुकानांचे थकीत भाडे वेळेत भरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment