होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धक्कादायक अन् संतापजनक घटना: पूल नाही, रुग्णवाहिका नाही; नदी पार करतांना महिलेचा बांबुच्या झोळीतच मृत्यू

On: August 24, 2026 3:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Nandurbar News: सातपुडयाच्या कुशीतील वेहगी गावाला जोडणारा रस्ता नाही, उपनदी असलेल्या नदीवर पुल नसल्याने एका तरुण विवाहितेचा बांबूच्या झोळीतून दवाखान्यात नेतांना वाटेतच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक आणि तेवढीच धक्कादायक आणि संतापजनक घटना अक्कलकुवा तालुक्यातील वेहगीच्या बारीपाडा येथे घडली आहे.

दुर्गम भागात पायाभूत सुविधांचा अभाव

देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम भागात पायाभूत सुविधांचा वनवास अद्याप पर्यंत संपलेला नाही. गावा गावांना जोडणारे किंवा मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते नाहीत, नदीवर पुल किंवा फरशी नाही, साकव पुल नाही. सातपुड्यात अशी कितीतरी गावे आहेत. या गावातील नागरिकांना जीव वाचविण्यासाठी अजून किती संघर्ष व हाल अपेष्टा सहन करत, किती जीव गमवावे लागतील, असा सवाल सातपुडयातील ग्रामस्थांनी सरकारला विचारला आहे.

गावाला जोडणारा पक्का रस्ता नाही

महिलेचे नाव रुसाबाई सुभाष वळवी (वय 23) असून या विवाहित तरुणीच्या शुक्रवारी संध्याकाळी 3.30 ते 4.00 वाजेच्या दरम्यान अचानकपणे छातीत व पोटात दुखू लागले. वेदना तीव्र झाल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली. मात्र, गावात पक्का रस्ता आणि गावाला जोडणाऱ्या नदीवर फरशीही नाही पावसाळ्यामुळे नदीला पाणी जास्त असल्याने रुग्णवाहिका गावात येऊ शकत नाही व नेटवर्क नसल्याने ग्रामस्थांना रुग्णवाहिकेला कॉल करता आला नाही. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी बांबू आणि चादरीची झोळी करुन रुसाबाईला पिंपळखुंटा येथील रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला पण रुग्णालयात पायपीट करुन नेत असतांना दुर्दैवाने रस्ता व अडथळ्यांची नदी पार करण्यात मोठा वेळ वाया गेल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुसाबाईची प्राणज्योत मालवली.

गावात उपचाराची सोय नाही

तरुण विवाहीतेला वेळेत उपचार असते तर श्रीमती रुसाबाई सुभाष वळवी यांचे प्राण वाचले असते. रुसबाईचे वेहगी बारीपाडा हे माहेरचे गाव होते तर त्यांचे सासर ओहवा येथे आहे. दोन दिवसापुर्वीच रुसाबाई ह्या सासरहुन पती सोबत माहेरी आल्या होत्या. आणि अचानक पणे त्यांची तब्बेत खालावली. रुसाबाई यांना सात महिन्याचे बाळ आहे. रुसाबाईच्या मृत्यूने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.

आमच्या जीवाला किंमत आहे की नाही?

आमच्या जीवाची शासनाला काहीच किंमत नाही का? असा संतप्त सवाल केला. प्रत्येक निवडणुकीत रस्त्याचे व पुलाचे काम करुन देण्याचे आश्वासन मिळते. रस्त्यासाठी ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वीच अक्कलकुवा येथे तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले होते. आंदोलनामुळे ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अत्यवस्थ रुग्ण, गरोदर माता, शालेय विद्याथीॅ, गावकरी, शासकीय कर्मचारी असे एकुण गावातील सुमारे 2000 हजार पेक्षा जास्त ग्रामस्थांना आजही नरकयातना भोगाव्या लागतात. आमच्या आरोग्याशी खेळणे थांबला पाहीजे. सरकारकडे सुविधा मागणे हा आमचा अधिकार नाही का? रस्ता आणि पुला अभावी अजून किती जीव जातील? शासन व प्रशासनाने किमान रस्ता आणि पुलाकडे तरी डोळसपणे पाहावे, अशी अपेक्षा आहे.

दिलीप जयसिंग पाडवी, ग्रामस्थ, वेहगी

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment