होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दीपके यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे मानले आभार: “जर त्यांनी आम्हाला कॉकरोच म्हटले नसते, तर प्रधान यांनी राजीनामा दिला नसता”

On: July 25, 2026 7:50 PM
Follow Us:
---Advertisement---

Cocokroch Janta Party: केंदीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, अभिजीत दीपके यांनी मंचावरून युवकांशी बोलतांना सांगितले की, हा “लोकशाहीचा विजय” आहे असे म्हटले असून “विद्यार्थी ऐक्य चिरायू होवो” अशी घोषणा दिली. पुढे दीपके म्हणाले की, त्यांनी हे करून दाखवले आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतर वर विजयोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान कॉकरोच जनता पक्षाने आज आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, असे जाहीर केले असून सरकारशी झालेल्या यशस्वी चर्चेत मागण्या मान्य केल्याने अंदोलन मागे घेत असल्याचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितले.

अभिजित दिपके काय म्हणाले?

अभिजीत दीपके यांनी सरन्यायाधीशांनी त्यांना कॉकरोच म्हटल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहे. जंतर मंतर येथे अभिजीत दीपके म्हणाले, “आमच्या आणखी दोन मागण्या आहेत. आम्ही इतक्यात माघार घेणार नाही. आम्ही कॉकरोच आहोत; एकदा आत शिरलो की बाहेर येत नाही. प्रधान यांचा राजीनामा हे सिद्ध करतो की, जर तुम्ही घाबरला नाहीत, तर तुम्ही जिंकू शकता.” दीपके पुढे म्हणाले, “आम्हाला कॉकरोच म्हटल्याबद्दल मी भारताच्या सरन्यायाधीशांचे आभार मानतो. जर त्यांनी आम्हाला कॉकरोच म्हटले नसते, तर प्रधान यांनी राजीनामा दिला नसता.”

जंतर मंतर येथे विजयोत्सव

दरम्यान सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण सोडले, त्यावेळी सरकार नरमल्याचे संकेत मिळाले होते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘विद्यार्थी ऐक्य चिरायू होवो’ अशी घोषणा दिली आणि याला ‘लोकशाहीचा विजय’ म्हटले. सरकारे राजीनामा देत नाहीत असे लोक म्हणत असले तरी, आपण हे साध्य केले आहे, असे दीपक म्हणाले. स्वतःला कॉकरोच बोलून, आपण सहजासहजी पद सोडणार नाही, असे ते म्हणाले. दीपक यांनी दोन नवीन मागण्याही केल्या.

पीडितांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी

दरम्यान दिपके यांनी दोन मागण्या केल्या आहे. पहिली मागणी ही आहे की, आंदोलनात सहभागी असलेल्या पोलिसांवर कारवाई करावी. याशिवाय, आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व खटले मागे घ्यावेत. त्यांची दुसरी महत्त्वाची मागणी आहे, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी. दीपके यांनी प्रत्येक पीडित कुटुंबाला एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

लोकशाहीचा विजय: सोनम वांगचुक

सामाजिक आणि पर्यावरण कार्यकर्ते प्रख्यात शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला लोकशाहीचा विजय म्हटले आहे. इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “सरन्यायाधीश आणि देशाच्या ‘जेन जी’ यांचे अभिनंदन; आणि भीती व धमकीवर मात करून देशाच्या कानाकोपऱ्यातून आवाज उठवणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार.”

आम्ही आंदोलन मागे घेत आहोत: सौरभ दास

सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर, कॉकरोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी असेही म्हटले की, “सहमत झालेल्या अटींची अंमलबजावणी निर्धारित वेळेत केली जाईल या विश्वासाने आणि सद्भावनेने आम्ही आमचे आंदोलन मागे घेत आहोत, असे कॉकरोच जनता पक्ष जाहीर करतो.” सरकार सोबत झालेल्या बोलणीनंतर हा निर्णय घेतला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

नेपाळ विनाशकारी पूर अन् भूस्खलन: मृतांची संख्या ६२६ वर पोहोचली

Leave a Comment