Jalgaon News: मध्य रेल्वेने जबलपूर ते कोयंबतूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचे नियमित सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह ऑक्टोबरपासून नियमित मेल/एक्सप्रेस गाड्या म्हणून धावणार आहे. या गाडीला नाशिक रोड व भुसावळ थांबा आहे. खान्देश वासियांना महत्त्वाची गाडी असून जळगावला थांबा दिल्यास येथील प्रवाश्यांची गैरसोय दूर होणार आहे.
या गाडीचे नियमित सेवेत रूपांतर होणार
गाडी क्रमांक २०१६० जबलपूर–कोयंबतूर साप्ताहिक एक्सप्रेस २३ ऑक्टोबरपासून पासून दर शुक्रवारी जबलपूर येथून सुटेल. तसेच गाडी क्रमांक २०१५९ कोयंबतूर-जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस पासून २६ ऑक्टोबरपासून दर सोमवारी कोयंबतूर येथून सुटणार आहे.

जबलपूर–कोयंबतूर साप्ताहिक एक्सप्रेस दर शुक्रवारी जबलपूरहून २३.५० वाजता सुटेल आणि रविवारी कोयंबतूर येथे १४.३० वाजता पोहोचणार आहे. दरम्यान कोयंबतूर–जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस दर सोमवार कोयंबतूर येथून १७.०५ वाजता सुटेल आणि बुधवारी जबलपूर येथे ०८.४५ वाजता पोहोचेल.
गाडीला असे थांबे असणार
या गाडीला थांबे पुढीलप्रमाणे आहे, जबलपूर, नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, मूकाम्बिका रोड बिंदूर, कुंदापूर, उडुपी, मुलकी, मंगळुरू, कासारगोड, कन्नूर, वडकारा, कोझिकोड मेन, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पलक्कड़ असे थांबे असणार आहे.
प्रवासी आयआरसीटीसी द्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करू शकतात, किंवा रेलवन ॲप वापरून अनारक्षित तिकिटे खरेदी करू शकतात. या गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी एनटीइएस ॲप डाउनलोड करता येईल, असे सांगण्यात आले आहे.











