होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

On: August 6, 2026 3:17 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत, तर ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

या परीक्षेद्वारे एकूण 5,707 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार विविध मागण्यांचा समावेश करून पदसंख्या वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसून, त्यांनी ‘My Account’ या पर्यायातून संबंधित माहिती अद्ययावत करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

तसेच, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी नियुक्तीपूर्वी करण्यात येणार असून, पात्रता सिद्ध न झाल्यास नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल, असेही आयोगाने जाहिरातीत नमूद केले आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment