होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G फोन भारतात होणार लॉन्च; ‘या’ दिवशी फ्लिपकार्टवर उपलब्ध

On: August 1, 2026 3:54 PM
Follow Us:
---Advertisement---

Samsung New Mobile Launch: सॅमसंगने आपला परवडणारा 5G फोन, गॅलेक्सी F70e, फेब्रुवारीमध्ये भारतात लॉन्च केला होता, ज्याची किंमत फक्त 12,999 रुपयांपासून सुरू होते. आता, सॅमसंग कंपनी या फोनचे ‘प्रो’ मॉडेलघेऊन येत आहे. सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G चे भारतातील लॉन्च निश्चित झाले आहे. हा फोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला जाईल, फ्लिपकार्टवर ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात लौंच होऊन डिलेव्हरीसाठी उपलब्ध होणार आहे. जो कमी किमतीत स्टायलिश लुक आणि प्रभावी वैशिष्ट्ये देईल. असा कंपनीचा दावा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G चे भारतातील लॉन्च

दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी ‘F 70 प्रो’चे भारतातील लॉन्च निश्चित झाले आहे. या आगामी 5G फोनसाठीची मायक्रोसाईट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आली आहे. गॅलेक्सी F70 प्रो 5G फोनबद्दलची अधिकृत माहिती त्याच वेबसाइटवर देण्यात आली आहे. कंपनीने अद्याप लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु हा सॅमसंग फोन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. गॅलेक्सी F70 प्रो हिरव्या रंगात दाखवण्यात आला आहे आणि यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. आणि तो फ्लिपकार्टवर ४ ऑगस्टला डिलेव्हरीसाठी उपलब्ध होणार आहे

सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G ची किंमत

कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G फोनची किंमत काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. हा फोन तीन मेमरी व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाईल. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 32,999 रु. असण्याची शक्यता आहे. 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असलेला 5G फोन 36,999 रु. मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे, आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 41,999 रु. मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, लीक झालेल्या माहितीनुसार हा सॅमसंग 5G फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेटवर आधारित असू शकतो. यात 4- नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 1.8GHz ते 2.4GHz पर्यंत आहे. हा आगामी सॅमसंग 5G फोन LPDDR5X रॅमसह येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वेगवान आणि सुरळीत मल्टीटास्किंग राखण्यास मदत होईल.

सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G अँड्रॉइड 16 वर चालण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ग्राहकांना सहाव्या पिढीचे OS अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. या सॅमसंग फोनमध्ये 6.7-इंचाचा FullHD+ डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. लीक्सनुसार, हा sAMOLED पॅनलवर आधारित असेल आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकेल.

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी, सॅमसंग गॅलेक्सी F70 प्रो 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. जर लीक्सवर अशी माहिती आहे की, स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, सोबतच 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, गॅलेक्सी F70 प्रो 5G मध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो.

बॅटरी

लीक्समधून असे समोर आले आहे की, सॅमसंग गॅलेक्सी एफ७० प्रो ५जी हा फोन भारतीय बाजारपेठेत पॉवर बॅकअपसाठी ६०००mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच, जलद चार्जिंगसाठी यात ४५W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाचाही सपोर्ट असू शकतो. येत्या काही दिवसांत सॅमसंग या ५जी फोनची आणखी काही वैशिष्ट्ये जाहीर होतील.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment