होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

On: September 1, 2026 3:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Navi Mumbai: ग्राहक आणि सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कायद्याचे पालन न करण्यावर कारवाई सुरूच राहील, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. नवी मुंबईत एफडीएने खाद्यपदार्थांच्या उत्पादन आणि मुदत समाप्तीच्या तारखांमध्ये बदल करून त्यांची विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ७६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त करण्यात आला. मुदतबाह्य वस्तू नवीन दाखवण्याचा हा खेळ खेळणाऱ्या रॅकेटच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्यावर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

या ठिकाणी केली कारवाई

अन्न व औषध प्रशासन आणि नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे २४ ते २९ ऑगस्ट दरम्यान नवी मुंबईतील तुर्भे परिसरात असलेल्या मे. साधना एंटरप्रायझेसवर छापा टाकला. तपासात या आस्थापनात खाद्यपदार्थांमध्ये फेरफार, रिपॅकेजिंग आणि लेबल्समध्ये बदल केल्याचे उघड झाले. एफडीएच्या म्हणण्यानुसार, मुंबई, नवी दिल्ली आणि नोएडा येथील दहा प्रमुख निर्यातदार कंपन्यांच्या मालाचा साठा त्याठिकाणी आढळून आला.

७६ लाखांचा माल जप्त

दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सुमारे ७५.२१ लाख रुपये किमतीचे ४,९४२ खाद्यपदार्थांचे खोके जप्त केले आहे. या कारवाईत सुमारे १.३० लाख रुपये किमतीचे लेबल नसलेले आणि मुदत संपलेले खाद्यपदार्थही आढळून आले आहे. काही उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित आस्थापनाकडे आवश्यक असलेला एफएसएसएआय (FSSAI) परवाना आणि खरेदीची बिले नव्हती.

मुदत बाह्य पॅकेटवर तारखा बदलण्याचा खेळ

एफडीएच्या दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळ पॅकेजिंगवरील उत्पादन आणि मुदत समाप्तीच्या तारखा खोडून त्यावर नवीन तारखा छापत होते. तसेच उत्पादनांमधील घटक आणि पौष्टिक माहितीवर नवीन स्टिकर्स चिकटवले जात असल्याचे आढळून आले. अशा प्रकारे जुने आणि मुदत बाह्य खाद्यपदार्थ नवीन तारखांसह पुन्हा विकण्यासाठी उत्पादने पॅक करत होते. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी खाद्यपदार्थाचे मोठ्या प्रमाणात पॅकेट्स जप्त केले.

लोकप्रिय ब्रॅण्ड्सचा समावेश

या कारवाई दरम्यान लोकप्रिय स्नॅक्स, पेये आणि इन्स्टंट फूडची विविध प्रकारची उत्पादने आढळून आली. यामध्ये वेफर्स, बटाटा चिप्स, नूडल्स, सूप आणि मेयोनीजच्या पाकिटांचा समावेश होता. आघाडीच्या एअरेटेड ड्रिंक ब्रँड्सच्या पेयांची पाकिटे आणि कॅन्सही जप्त करण्यात आले. एफडीएच्या म्हणण्यानुसार, या उत्पादनांचे रिपॅकेजिंग आणि लेबल्समध्ये बदल करण्याचे प्रयत्न केले जात होते.

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर, आस्थापनाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. आस्थापनाचे भागीदार आणि संबंधित निर्यातदारांविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment