होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

काका, आम्हाला खेळू द्या न! खेळाच्या जागेत मुजोर चारचाकी मालकांचा अड्डा, महापौरांनी दिले कारवाईचे आदेश

On: July 24, 2026 5:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: येथील निमखेडी शिवारातील साईनगरात खुले मैदान असून याठिकाणी अवैध आणि दादागिरी करत चारचाकी वाहने लावून चिमुकल्यांना मुजोरांकडून हटकण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर वाहनांचे नुकसान झाल्यास पालकांना जबाबदार धरत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार होत असल्याने संतप्त पालकांनी महापौर दीपमाला काळे यांना याप्रकरणी दि. २४ जुलै रोजी निवेदन दिले.

साईनगर 115/2 निमखेडी शिवार वॉर्ड क्र. नऊ येथे खुले मैदान असून हे लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच वृद्ध नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी येथे काही साहित्य आणून ठेवले आहे. यावेळी सकाळी आणि सायंकाळी येथे लहान आणि तरुण मुले ही खेळतांना किंवा व्यायाम करतांना आढळतात तर वृद्ध येथे बसण्यासाठी येतात. मात्र, काही मुजोर नागरिक येथे आपल्या चारचाकी अवैध पद्धतीने लावत असल्याने बालकांचा खेळण्याचा हक्क हिरावतात. खेळता खेळता कोणत्या चारचाकी वाहनाला काही नुकसान झाले तर धाक-दपटशाही करत पालकांकडून पैसे वसूल करण्याची धमकी देण्याचे प्रकार साईनगरात सर्रास सुरु आहे.

दरम्यान, हे मैदान खेळण्यासाठी आहे की, अवैध पार्किंगसाठी? असा सवाल येथील नागरिक करत आहे. या क्रमांक नऊ नंबरच्या वॉर्डात अनेक रहिवाशांकडे चारचाकी वाहने आहेत. ती मैदानात अवैधरित्या पार्किंग तर करतातच त्याचप्रमाणे लहान मुलांना येथे खेळण्यासाठी देखील नकार देतात. या जाचाला कंटाळून येथील नागरिकांनी महापौरांना निवेदन दिले आहे. दरम्यान यावेळी नागरिकांना विचारले असता त्यांनी लहान मुलांकडून झालेल्या चारचाकीच्या नुकसान भरपाईसाठी अव्वाच्या सव्वा पैसे मागितले जातात. ही एक प्रकारची खंडणी नाही का, असा सवालही उपस्थित केला आहे.

तारेचे कंपाऊंड तोडले

काही नागरिकांना सुविधा व्हावी, म्हणून त्यांनी चारही बाजूला लावलेले तारेचे कंपाऊंड तोडून ती जागा आपल्या मालकीची असल्याचा आव आणला आहे. यावेळी कोणीही तेथे खेळण्यासाठी गेले असता त्याठिकाणाहून त्यांना पळवून लावले जाते. ही जागा अतिक्रमित असून यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून होताना दिसत आहे.

दडपशाही चालणार नाही: महापौर काळे

साईनगर भागातील मैदानाची लवकरात लवकर पाहणी करून ज्या नागरिकांनी तारेचे कंपाऊंड तोडले आहे, त्यांच्यावर तसेच जे नागरिक येथे अवैधरित्या वाहन पार्किंग करत असतील त्यांच्यावरही कारवाई करणार आहे. खुले मैदान हे मुलांना खेळण्यासाठी असते, त्यावर कोणीही पार्किंग करू शकत नाही. पार्किंग केल्यास आणि चारचाकीचे नुकसान झाल्यास त्याला कोणताही पालक जबाबदार राहणार नाही.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment