Nashik News: प्रवाश्यांच्या सेवेसाठी रेल्वेतर्फे विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात नयेत आहे. आता हळूहळू गाड्यांना मिळणारा प्रतिसाद बघून विशेष गाड्यांचे नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करून त्यांचे संचालन करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार प्रयागराज-सुबेदारगंज ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दोन साप्ताहिक विशेष गाड्या आता नियमित अमृत भारत एक्सप्रेस म्हणून धावतील, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.
गाडी क्रमांक ०४११५-०४११६ ही विशेष नियमित गाडी क्रमांक १४१२१-१४१२२ सुबेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस–सूबेदारगंज अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक) म्हणून चालवली जात होती.आता गाडी क्रमांक १४१२१ सुबेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस २७ ऑगस्टपासून दर गुरुवारी सुबेदारगंज येथून १२.१० वाजता सुटेल आणि शुक्रवारी २०.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

एलटीटी- सुभेदारगंज २८ ऑगस्टपासून नियमित
गाडी क्रमांक १४१२२ लोकमान्य टिळक टर्मिनस–सुबेदारगंज अमृत भारत एक्सप्रेस २८ ऑगस्टपासून दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २२.५५ वाजता सुटेल आणि रविवारी ७.३० वाजता सुबेदारगंज येथे पोहोचणार आहे.
या गाडीला फतेहपूर, गोविंदपुरी, भरूआ सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूटधाम कर्वी, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खंडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे.थांबे असे असतील,
गाडी क्रमांक ०४१५१/०४१५२ ही प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज विशेष नियमित गाडी क्रमांक २०४३६/२०४३५ प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस (साप्ताहिक) म्हणून चालवली जाईल.
प्रयागराज-एलटीटी गाडी २१ ऑगस्टपासून
गाडी क्रमांक २०४३६ प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस अमृत भारत एक्सप्रेस २१ ऑगस्टपासून दर शुक्रवारी प्रयागराज येथून १८.१० वाजता सुटेल आणि शनिवारी १५.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
एलटीटी-प्रयागराज २२ ऑगस्टपासून
गाडी क्रमांक २०४३५ लोकमान्य टिळक टर्मिनस–प्रयागराज अमृत भारत एक्सप्रेस २२ ऑगस्टपासून दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७.२० वाजता सुटेल आणि रविवारी १२.४० वाजता प्रयागराज येथे पोहचणार आहे..
गाडीला सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याण. अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना जनरलचे ११ आणि स्लीपरचे ८ डबे राहणार आहे.










