होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

स्व. गोपीनाथ मुंडें यांच्या बाबत कॉग्रेसचे जेष्ठनेते पृथ्वीराज चव्हाण यांचे महत्त्वाचे विधान; पत्रकार परिषदेत काय म्हणाले ‘ते’ जाणून घ्या

On: August 16, 2026 7:19 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: गोपीनाथ मुंडे आमच्यासोबत असते तर 2014 ची निवडणूक हारलो नसतो, महाराष्ट्रात आमची पुन्हा सत्ता आली असती तर गोपीनाथ मुंडे यांचं नाव मुख्यमंत्रीपदी सुचवले असते, असे ही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषद घेत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भातील विधानाबाबत भूमिका स्पष्ट केली.

गोपीनाथ मुंडे यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कराडच्या पत्रकार परिषदेत वड्डेटीवर यांना विचारण्यात आला होता. पंकजा मुंडे यांना काँग्रेसमधे येण्याबाबत ते बोलले होते. त्यावर मी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत आठवण सांगितली होती. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यावेळी सगळं काही व्यवस्थित झालं असतं आणि ते आमच्या सोबत आले असते तर, २०१४ ला आम्ही निवडणूक हारलो नसतो. त्यावेळी आम्ही निवडून आलो असतो तर राष्ट्रवादीने मला मुख्यमंत्री होऊ दिलं नसतं. पण मी त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी गोपीनाथ मुंडे यांच नाव सुचवलं असतं, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. गोपीनाथ मुंडे यांचा मी अजिबात अवमान केलेला नाही. माझ्या त्यांच्या बाबतच्या भावना व्यक्त केल्या होत्या. गोपीनाथ मुंडे यांचा इतिहास लिहिला गेला पाहिजे, तो युवकांना समजला पाहिजे, असंही त्यांनी सांगितले.

अमित शाह यांच्याबाबतच्या ‘त्या’ शब्दांसाठी दिलगिरी

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोल्हापूरला सतेज पाटील यांच्याकडे गेलो होतो. त्याठिकाणी कोल्हापूरमध्ये काही बोललो होतो. नीट परीक्षेबाबत आणि 20 जुलैच्या आंदोलन विषयी बोललो होतो. राहुल गांधी यांनी संसदेचं अधिवेशन चालू दिलं नाही असं म्हणत असतील तर चुकीच आहे. कारण गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेत आले नाहीत, त्यांनी संसदेतून पळ काढला होता. नवी दिल्ली राजधानी असल्यामुळे त्याठिकाणी असणारी कायदा सुव्यवस्था ही जबाबदारी अमित शाह यांच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही सवाल उपस्थित केला. विद्यार्थी यांच्यावर पेलेट गन वापर करण्याचे आदेश कुणी दिले? ते त्यांनी दिले नसतील तर कुणी दिले? याच उत्तर मिळावं असा उद्देश होता. मला ते गृहमंत्री पदाला लायक आहेत का? असा सवाल उपस्थित करायचा होता. मात्र माझ्या तोंडून दुसरा शब्द गेला. त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment