होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

बाबा रामदेव यांचा विमा क्षेत्रात प्रवेश; आता पतंजलीचा ही मिळणार विमा

On: July 30, 2026 7:52 PM
Follow Us:
---Advertisement---

Bussiness News: आयुर्वेदिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या पतंजलीतर्फे आता विमा क्षेत्रात उतरणार आहे. वित्त क्षेत्रात पंतजलीकडून पहिल्यांदाच प्रवेश करण्यात आला आहे. एफएमसीजी आणि आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रवेश केला आहे. आयुर्वेदासह रोजच्या वापरातील साबण, टुथपेस्ट, फेसवॉश, तूप, अगरबत्तीपासून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या पतंजलीचे विमा क्षेत्रातील पाऊल मोठा निर्णय मानला जात आहे. ‘आयआरडीएआय’ने कंपनीच्या मॅग्मा जनरल इन्शुरन्सच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. ‘आयआरडीएआय’ (IRDAI) ने मंजुरी दिली असून पतंजलीचा विमा बाजारात येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

पतंजली आणि डीएस ग्रुपचा पुढाकार

दरम्यान पतंजली आयुर्वेद आणि डीएस ग्रुपने भागीदारीत केलेल्या अधिग्रहणाला भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला आहे. त्याचे ४,५०० कोटी रुपये या अधिग्रहणाचे मूल्य असून डीएस ग्रुप खाद्यपदार्थ आणि मिठाई व्यवसायात कार्यरत आहे. दरम्यान करारानुसार, पतंजली आयुर्वेद मॅग्मा जनरल इन्शुरन्समध्ये ७३.५६ टक्के हिस्सा विकत घेणार आहे. तसेच डीएस ग्रुपकडे २४.५ टक्के मालकी हक्क राहणार आहे. सनोटी ग्रुप हा आदर पूनावाला ग्रुपचाच एक भाग आहे. सनोटी प्रॉपर्टीज एलएलपीच्या भागधारकांकडून पतंजली आणि डीएस ग्रुपकडे ९८ टक्के मालकी हक्क असेल.

‘आयआरडीएआय’ची मंजुरी

‘आयआरडीएआय’ने दिलेली (IRDAI) मंजुरी तीन महिन्यांसाठी वैध राहणार आहे. या कालावधीत कंपनीवर व्यवहारपूर्ण करण्याची जबाबदारी राहणार आहे. वित्तीय क्षेत्रात पंतजलीकडून पहिल्यांदाच प्रवेश करण्यात आला आहे. दरम्यान, पतंजली आयुर्वेदने यापूर्वी एफएमसीजी आणि आयुर्वेद क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. विमा क्षेत्रात नव्या कंपनीची सुरुवात करण्यापेक्षा पतंजलीने यापूर्वीच अस्तित्वात असलेल्या कंपनीचे अधिग्रहण करण्याला प्राधान्य दिले आहे. तसेच (Magma General Insurence) मॅग्मा जनरल इन्शुरन्स कंपनी ही आरोग्य, वाहन, मालमत्ता, व्यावसायिक विमा क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे पतंजली या क्षेत्रात किती यश मिळते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment