Sharad Pawar Statement: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पक्षाच्या दोन गटांमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या. दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, “यात काही अर्थ नाही.” असे सांगून त्यांनी होणारी चर्चां फेटाळून लावली आहे.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) नेत्यांनी दावा केला होता की, जानेवारी महिन्यात विमान अपघातात निधन झालेले तत्कालीन अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या बाजूने होते. शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दादा होते, तेव्हा विलीनीकरणाची चर्चा चालू होती. पण, आता ते शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरी चर्चा काही थांबल्या नाही. अखेर शरद पवार यांनी त्याबाबत महत्त्वाचे विधान करून चर्चाना विराम दिला आहे.

दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी भाजपप्रणीत सरकारच्या पीक कर्जमाफी योजनेचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, सरकारने टप्प्याटप्प्याने या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. पवार म्हणाले, “आम्ही आणखी १५ दिवस वाट पाहू. त्यानंतरच आम्ही त्यावर भाष्य करू.” असे म्हणाले.











