होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महत्त्वाची बातमी: वाघूर धरणाच्या जलसाठ्यात ५ दिवसात १४ टक्क्यांची वाढ; हतनूरचा जलसाठा किती ‘ते’ जाणून घ्या

On: August 20, 2026 4:18 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव आणि भुसावळकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसला तरी अधून मधून येणाऱ्या सरींमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अल निनोचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. जळगावमध्ये अद्याप मुसळधार पावसाची गरज भासत आहे. जळगाव आणि भुसावळसाठी महत्त्वाच्या असलेल्या वाघूर आणि ऊर्ध्व तापी हतनूर या दोन्ही धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसात वाघुरच्या जलसाठ्यात १४.३५ टक्के तर हातनूरच्या जलसाठ्यात ४.२३ टक्के वाढ झाल्याचे जलसंपदाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

जळगाव शहराच्या दृष्टीने वाघूर (Waghur) धरणाच्या जलसाठ्यातील वाढ समाधानकारक दिसून येत आहे. एकंदरीत १४ ते २० ऑगस्ट दरम्यानच्या ५ दिवसात पाणीसाठा १४.३५ टक्क्यांनी वाढून झाली असून एकूण आजचा उपयुक्तसाठा हा ७४.८६ टक्क्यावर गेला आहे. पाच दिवसापूर्वी धरणात ६०.५१ टक्के पाणीसाठा होता. प्रकल्पातील आजचा उपयुक्त जलसाठा २४८ (द.ल.घ.मी) इतका आहे. एकूण प्रकल्पात जलसाठा ३२५ (द.ल.घ.मी) इतका आहे. जलसाठ्यात झालेली वाढ महत्त्वाची असून जळगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. असे असले तरी शेतीसाठी पावसाची गरज कायम आहे.

हतनूरच्या ही जलसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हतनूर (Hatnur) धरणात पाच दिवसापूर्वी ५१.०६ इतका पाणीसाठा होता. प्रकल्पातील आजच्या उपयुक्त जलसाठ्यात ४.२३ टक्क्यांची वाढ होऊन जलसाठा ५५.२९ टक्क्यांवर गेला आहे. मागीलवर्षी धरणात ४० टक्के साठा होता. आता आजचा जलसाठा ५५.२९ टक्के इतका झाला आहे. तरी अद्याप भुसावळकरांची पाण्याची वर्षभर तहान भागवण्यासाठी आणखी पावसाची आवश्यकता आहे. हतनूर धरणात एकूण प्रकल्पीयसाठा हा ३८८ (द.ल.घ.मी) इतका तर उपयुक्तसाठा २५५ (द.ल.घ.मी) आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची गरज असून सध्या पावसाने विश्रांती घेतली असून पाऊस आणखी लांबला तर भुसावळकरांची चिंता वाढणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment