Jalgaon News: सण-उत्सवाचा काळात जळगावमध्ये कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. उत्सवादरम्यान अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने समाजकंटक आणि सराईत गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा तरतुदींनुसार अनेक कुख्यात टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या असून एकूण ५० सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.
दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असून आणि जळगावमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहावी, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी गुंन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना हद्दपार करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहे. पोलीसांनी इशारा दिला आहे की, सण-उत्सवांत शांतता राखावी. तसेच कायदा व्यवस्था बाधित करणाऱ्याची हयगय केली जाणार नसल्याचे सांगून अशांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत जळगाव शहर, धरणगाव, पाचोरा, एमडीसी, नशिराबाद, चोपडा, चाळीसगाव, भडगाव, जामनेर, पारोळा, एरंडोल, यावल, अमळनेर, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सराईतांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. एमआयडीसी आणि नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हददीत कारवाई करण्यात आली. त्यामध्ये आकाश उर्फ खंडया सुकलाल ठाकुर, पवन उर्फ बड्या बाविस्कर, आकाश उर्फ आक्या ब्रो रविंद्र मेरा, आकाश दहेकर, तारझन उर्फ बल्लू दहेकर, अमन उर्फ खेकडा रशिद , रवी प्रकाश, गुरुदयालसिंग टाक, गिरीष घुगे, करण उर्फ विजय केदार, समीर उर्फ सनी संदानशिव, वसीम शहामान शहारा, सादिक शहा हाफिजउल्ला शहा सर्व राहणार जिल्हा जळगाव यांच्यावर कारवाई करण्यात आली.









