Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात आज येलो अलर्ट होता, सकाळी पावसाचे ढग दाटून आले होते, पावसाचे वातावरण निर्माण झाले, मात्र, त्यानंतर काळे ढग पुढे सरले आणि अचानक आकाश निळेशार दिसू लागले तसेच सकाळी चक्क ऊन पडले होते. आज उद्या जळगावला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पण, पावसाचा पत्ता नाही. २४ तासात शून्य मिमी पावसाची नोंद दिसून येत आहे. पुढील ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान [पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. हलक्या सरी बरसतील असा अंदाज असला तरी पावसाने जळगावला हुलकावणी दिली आहे. तर जळगावचे आजचे कमाल तापमान ३१.५ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे.
राज्यातीळ हवामान स्थिती
जळगावला ११ त १३ दरम्यान ग्रीन अलर्ट असून पुढील पाच दिवस धुळे, नंदुरबारला देखील ग्रीन अलर्ट असून हलका व मध्यम पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर येथे १० ते १३ ऑगस्ट दरम्यान हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे. आज जळगाव नाशिक आणि अहिल्यानगरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र, जळगाव वगळता नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला. दरम्यान आज ०९ ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची दाट शक्यताअसून कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे.

१० ऑगस्ट रोजी असे असेल हवामान
१० ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.
११ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.
१२ – १३ ऑगस्ट दरम्यान कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भात काही ठिकाणी; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.
हवामान विभागाचा इशारा
आज ०९ ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची दाट शक्यता. कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता.
१० ऑगस्ट: विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता.
११-१३ ऑगस्ट निरंक








