Nashik News: मध्य रेल्वे आगामी गणेशोत्सव काळात भाविकांच्या सोयीसाठी नागपूर आणि मडगांव दरम्यान गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. नाशिक रोड आणि इगतपुरी येथे या गाडीला थांबे आहेत. तसेच भुसावळ मार्गे ही गाडी धावणार आहे. जळगावला थांबा नसून या गाडी थेट भुसावळ थांबा देण्यात आला आहे. नाशिकच्या प्रवाश्यांना नागपूर आणि मडगावला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे.
या विशेष गाड्यांचा तपशील
गाडी क्रमांक ०११३९ विशेष गाडी १९ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर पर्यंत दर बुधवारी नागपूर येथून २३.४५ वाजता सुटेल आणि मडगांव येथे शुक्रवार ०५.३० वाजता पोहचणार आहे. या गाडीच्या ६ सेवा राहतील. तसेच गाडी क्रमांक ०११४० गाडी १८ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर पर्यंत दर मंगळवारी मडगांव येथून १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे बुधवार रोजी २१.२५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या देखील ६ सेवा राहतील.

गाडीला ही थांबे असणार
या गाडीला ही थांबे असणार आहेत. वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.आदी थांब्यांचा समावेश राहणार आहे.








