होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मंत्री भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही!

On: August 23, 2026 4:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, त्यावर आम्ही काय बोलणार, सरकार त्यासंदर्भात बोलेल आणि निर्णय घेतील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केलं. एकीकडे मनोज जरांगे पाटील याच्याकडून २९ ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी आज समता परिषदेची बैठक घेतली. तसेच राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. भुजबळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी, मनोज जरांगे पाटील यांच्या २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनावरही त्यांनी भूमिका मांडली, तर लक्ष्मण हाकेंकडून ओबीसींचे आरक्षण संपल्याबाबत सातत्याने होत असलेलं वक्तव्य अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले..

कोण म्हणते ओबीसीचे आरक्षण संपले? जात पडताळणीमध्ये चुका असतील तर त्यावर आम्ही लढत आहोत. २०११ पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती. त्यावर सरकारने निर्णय घेतला आहे. सरकार आमच्यासोबत आहे, त्यावर आम्ही आता काय बोलणार, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले की, आम्ही जात जनगणना करण्याची मागणी केली, त्यावर सरकार काम करत आहे. ओबीसीमध्ये किती जाती त्याबाबत सरकार निर्णय घेणार आहे. प्रत्येक राज्यात ओबीसींचे नाव आहे, त्यावर आम्ही मागणी केली त्याचा शोध घेतला जात आहे. माळी समाज हा महाराष्ट्रात आहे, जेव्हा लढायचं तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आम्ही राज्यात फिरलो. छगन भुजबळ हा काय घाबरला का? असे म्हणत गरज होती तेव्हा आपण लढल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. तर, सरकार आमच्यासोबत आहे म्हणून चर्चेतून आम्ही मार्ग काढत आहोत, असे ही ते म्हणाले.

मंत्री भुजबळ म्हणाले, तुकाराम मुंढे चांगलं काम करत आहेत, अन्न हा असा प्रकार आहे, जो श्रीमंत गरीब सर्वांसाठी आवश्यक आहे. स्वच्छता असणे हे त्यासाठी महत्त्वाचे आहे. मुंढे ज्यावर बोट ठेवतात त्यावर सगळेच मागणी करतात, तशीच मागणी अंगणवाडी समितीने केल्याचे सांगत अंगणवाडीतील भोजनव्यवस्थेवरही भुजबळांनी भूमिका स्पष्ट केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment