Samsung Galaxy S26 FE: सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन, गॅलेक्सी एस२६ एफई, २७ ऑगस्ट रोजी लॉन्च करणार आहे. चाहते या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामध्ये प्रीमियम फीचर्स, प्रभावी एआय टूल्स, एक शक्तिशाली ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि एक दमदार बॅटरी आहे, त्याची कोणकोणती वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेऊया.
ग्राहकांची मोठ्या प्रमाणात सॅमसंगच्या सिरीजवर नजर असते. टेक क्षेत्रातील दिग्गज सॅमसंग पुन्हा एकदा स्मार्टफोनच्या जगात खळबळ माजवण्यासाठी सज्ज आहे. कंपनी २७ ऑगस्ट रोजी एका मोठ्या गॅलेक्सी फोनच्या लाँचिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सॅमसंगचा मोठ्या चर्चेत असलेला स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस२६ एफई, लॉन्च केला जाणार आहे. सॅमसंगची ‘फॅन एडिशन’ (FE) सिरीज नेहमीच अशा ग्राहकांमध्ये लोकप्रिय राहिली आहे, फ्लॅगशिप फोनच्या (गॅलेक्सी एस सिरीज) प्रीमियम फीचर्सचा कमी किमतीत आनंद देते.

लॉन्च कार्यक्रम कधी आणि कुठे?
सॅमसंगचा मोठा कार्यक्रम २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता सुरू होईल. हा खास क्षण घरबसल्या पाहण्यासाठी, तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपणात सामील होऊ शकता. कंपनीने स्वतः पुष्टी केली आहे की, गॅलेक्सी एस २६ सिरीजमध्ये एक नवीन फोन सादर केला जाईल. जरी त्यांनी त्याचे नाव थेट उघड केले नसले तरी, अहवालांनुसार तो ‘गॅलेक्सी एस २६ एफई’ (Galaxy S26 FE) असेल हे स्पष्ट आहे.
डिझाइन आणि डिस्प्लेमध्ये काय विशेष असेल?
लीक झालेल्या माहितीनुसार, या नवीन फोनमध्ये एक मोठा आणि आकर्षक ६.७-इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले असू शकतो. गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव दुप्पट करण्यासाठी यात १२०Hz रिफ्रेश रेट आणि १,९०० निट्सची पीक ब्राइटनेस असण्याची अपेक्षा आहे. हा फोन डिझाइनच्या बाबतीतही खूप आकर्षक असेल. तुम्हाला मागील बाजूस पिल-शेप्ड (गोळीच्या आकाराच्या) कॅमेरा मॉड्यूलची पूर्णपणे नवीन शैली दिसेल. ॲल्युमिनियम फ्रेम, गोरिला ग्लास प्रोटेक्शन आणि वॉटर-डस्ट रेझिस्टन्स (IP68) यांसारखी वैशिष्ट्ये त्याला मजबूत आणि स्ट्रॉंग बनवतात..
शक्तिशाली प्रोसेसर आणि ७ वर्षांपर्यंतचे अपडेट्स
हा फोन परफॉर्मन्सच्या बाबतीत खूप वेगवान असेल, कारण तो सॅमसंगच्या नवीन ३-नॅनोमीटर एक्सिनोस २५०० प्रोसेसर असण्याची असण्याची शक्यता आहे. हा फोन १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये ८ जीबी रॅमसह येण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सॅमसंग या फोनसाठी सात वर्षांच्या सॉफ्टवेअर आणि सुरक्षा अपडेट्सची हमी देत आहे. इतकेच नाही, तर यात एआय (AI) ची जादू देखील असेल. फोटो एडिटिंगपासून ते काहीही शोधण्यापर्यंत, ‘गॅलेक्सी एआय’ची अनेक प्रभावी वैशिष्ट्ये या फोनमध्ये असतील.
उत्कृष्ट कॅमेरा आणि शक्तिशाली बॅटरी
फोटोग्राफीसाठी चाहत्यांना या फोनमध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे असण्याची शक्यता आहे. यामध्ये ओआयएस (OIS) सपोर्टसह ५०-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, १२-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि ३x झूमसह ८-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स यांचा समावेश असू शकतो. सेल्फीसाठी १२-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा अपेक्षित आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, मागील मॉडेलपेक्षा यात मोठी ४,९०० (mAh) एमएएच बॅटरी असण्याची शक्यता आहे आणि हे ४५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
भारतात किंमत काय असेल?
सॅमसंगने अद्याप अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही, परंतु एका अहवालानुसार भारतात या फोनची किंमत ₹६०,००० ते ₹६५,००० च्या दरम्यान असू शकते. २७ ऑगस्ट रोजी लॉन्च झाल्यानंतर सॅमसंग कंपनी अचूक किंमत, ऑफर्स आणि उपलब्धतेचा तपशील लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे..










