होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

इराणी माध्यमांचे वृत्त: होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरुंगाला धडकल्याने एका तेलवाहू जहाजाचा स्फोट

On: July 26, 2026 7:16 PM
Follow Us:
---Advertisement---

America Iran Conflict: होर्मूझ सामुद्रधुनीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणी अधिकाऱ्यांशी कोणताही समन्वय न साधता एका तेलवाहू जहाजाचा स्फोट झाला आहे. इराणच्या सशस्त्र दलांनी निश्चित केलेला मार्ग सोडून जाणारे तेलवाहू जहाज पाण्यातील सुरुंगाला धडकल्याने स्फोट झाला. दरम्यान इराणने अमेरिकेशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मूझ सामुद्रधुनीच्या परिसरात पाण्यामध्ये सुरुंग पेरले आहे. या कथित घटनेवर इराणी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

या वृत्तात म्हटले आहे की, यापूर्वी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने वारंवार इशारा दिला होता की, जर जहाजे इराणच्या घोषित मार्गापासून विचलित झाली, तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. यापूर्वी, जेव्हा आयआरजीसीने (IRGC) काही जहाजे थांबवली किंवा त्यांच्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी निवेदने जारी करून म्हटले होते की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाने इराणी अधिकाऱ्यांशी पूर्ण समन्वय साधणे आवश्यक आहे आणि त्यांनी इराणी अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या मार्गांमधूनच जाणे गरजेचे आहे, असे अल जंजिराने वृत्त दिले आहे.


इराणी माध्यमांनुसार, तेहरानने निश्चित केलेला होर्मुझ मार्ग सोडल्यानंतर टँकर सुरुंगावर आदळला. तस्निम वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, या महत्त्वाच्या जलमार्गात तेहरानने मंजूर केलेला मार्ग सोडल्यानंतर हे जहाज सुरुंगावर आदळले. या कथित घटनेवर इराणी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पूराचा तडाखा: उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

कांद्याचे दर वाढले; ‘कांदा एक्सप्रेस’ अन् रस्ते वाहतुकीद्वारे देशभरात कांद्याचे वितरण

भारत-उझबेकिस्तान हे व्यापक सामरिक भागीदार: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार मोदी यांना प्रधान

नेपाळमध्ये पुराचे तांडव: आतापर्यंत ७३४ जणांचा मृत्यू; राज्यातील ४०४ नागरिक सुरक्षित, ३३८ जण शासकीय यंत्रणांच्या संपर्कात

मोठी बातमी: इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेसचे सीईओ लक्ष गोपीसेट्टी नेपाळमधील पुरात बेपत्ता; कंपनीने निवेदन केले जारी

नेपाळ विनाशकारी पूर अन् भूस्खलन: मृतांची संख्या ६२६ वर पोहोचली

Leave a Comment