Beed News: राज्यात बहुतांश ठिकाणी धुवाँधार पाऊस सुरू आहे, अमरावतीला येलो अलर्ट देण्यात आला आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला आहे. यात पावसाच्या कचाट्यात सापडलेल्या शंभर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. परिणामी नदी नाल्याला पूर आला असून नदीकाठीच्या लोकांना सुरक्षित स्थळी रात्री हलवण्यात आले. मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी परिस्थितीची दखल घेतली आहे.
दरम्यान नांदगाव खंडेश्वर मधील धामक, खेड पिंपरी, धानोरा गुरव, मंगरूळ चव्हाळा, परसमंडळ, दिघी कोल्हे आदी गावासह अनेक गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. गावाला नदी नालाची स्वरूप आले. तर सातरगाव परिसरात मेंढी नाल्याच्या पुरात आल्याने यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नांदगाव खंडेश्वर शहरात देखील पावसाने कहर केला आहे. गावात पाणीच पाणी दिसून येत आहे. शेतीचे देखील नुकसान झाले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शेकडो लोकांना नांदगाव खंडेश्वरच्या मंगल कार्यालयामध्ये रात्री उशिरा व्यवस्था करून त्यांना ठेवण्यात आले.

दरम्यान बीड, अकोला, अमरावती, भंडारा, वुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ आदी विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट असून याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी व कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाला अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान बीड, अकोला, अमरावती, भंडारा, वुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ आदी विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट असून याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.










