होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावसह नाशिक-धुळ्याला ‘रेड अलर्ट’; आज धुवाँधार पाऊस, उद्या कसे असेल हवामान ‘ते’जाणून घ्या

On: July 31, 2026 1:57 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगावला आज येलो वरून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आता दुपारी पुन्हा हवामान खात्याने जळगावला रेड अलर्ट असून आज पुन्हा जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. तसेच धुळे आणि नाशिकला देखील देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक घाट परिसराला अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर नंदुरबारला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क आहे. घाट माथ्यावरील धोक्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळणायचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक-पुण्याला रेड अलर्ट

नाशिक-पुणे घाट परिसराला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या पावसामुळे निकाली निघणार आहे. शेतकरी एक पावसाची वाट पाहत होते, आधीच खरिपाच्या पेरण्यांना उशीर झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरण्यांना जोरात सुरवात केली आहे. पुढील तीन दिवस दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान पुढील तीन दिवस दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

जळगावला शनिवारी हलका-मध्यम पाऊस

उद्या दि. १ ऑगस्ट रोजी उत्तर मध्य महा राष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे.
उत्तर कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे.
दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. उद्या नंदुरबारला येलो अलर्ट असून मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. जळगाव, धुळे, नाशिकला उद्या ग्रीन अलर्ट असून यथाईकानी हलका आणि माध्यम पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment