होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

MSRTC News: प्रवाशांना दिलासा! बसच्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

On: July 29, 2026 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

MSRTC News: एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी अवश्यक असलेल्या NCMC स्मार्ट कार्ड संबंधित ही अपडेट आहे. सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापूर्वी 1 ऑगस्टपासून हे कार्ड एसटी प्रवासासाठी अनिवार्य करण्यात येणार होते. मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 1 ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेताला होता.

मात्र, राज्यातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी काही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे केवळ कार्ड उपलब्ध न झाल्याने पात्र प्रवाशांना शासनाच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, याची दखल घेत या कार्डसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.  या मुदतवाढीमुळे NCMC स्मार्ट कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

दरम्यान, राज्यभरातील सर्वच बसडेपो आणि शहरात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी प्रवाशी, सवलतीमधील प्रवाशांची आणि नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी नागरिकांना हे कार्ड जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रार देखील समोर येत आहेत. त्यामुळे, प्रवासी, नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून आता ही मुदत आणखी एक महिना वाढवण्यात आली आहे.

 

दरम्यान, बसची सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

Leave a Comment