CJP Protest: पेपर फुटीच्या मुद्द्यावरून जंतर-मंतरवर सीजेपीच्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, केंद्र सरकारने चर्चेचे प्रस्ताव चार वेळा पाठवल्याचा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, सरकार कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी चर्चेसाठी तयार आहे. दरम्यान, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. चर्चेमुळे हा तिढा सुटेल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला सरकारने चर्चा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाने हा प्रस्ताव फेटाळला असून तसे वृत्त एएनआयने गुरुवारी सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिले. दरम्यान, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, सरकारने आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना चार वेळा औपचारिक चर्चेचे प्रस्ताव पाठवले आहे. ते पुढे म्हणाले, सरकार कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी आणि आंदोलकांना सोयीस्कर असेल त्यावेळी चर्चा करण्यास तयार आहे. तथापि, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या सीजेपीने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे आंदोलन आणि सरकार यांच्यातील कोंडी कायम आहे. (CJP Protest)

दरम्यान पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांवरून सरकार आणि आंदोलक यांच्यात मतभेद आहे. सीजेपीन शिक्षण व्यवस्थेवर सर्वसमावेशक चर्चा, परीक्षा पद्धतीत बदल आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, २५ दिवसांपासून उपोषणावर असलेले लडाखचे शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपली भूमिका नरम केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आंदोलनात सहभागी असलेल्या तरुणांवरील खटले मागे घेतल्यास, ते आंदोलकांना आंदोलन स्थगित करून सरकारशी चर्चा सुरू करण्याचे आवाहन करतील, असे म्हणाले.










