होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावला आज अन् उद्या मुसळधार पावसाचा अंदाज; राज्यात ‘या’ ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट

On: August 8, 2026 12:34 PM
Follow Us:
---Advertisement---

North Maharashtra Weather Update: जळगावमध्ये आज आणि उद्या सलग दोन दिवस येलो अलर्ट दिला आहे. येथे मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जळगावमध्ये आज उकाडा जाणवत आहे. सकाळी काही काळ पाऊस पडला आहे. तरी, ऊन देखील पडल्याने वातावरणात काहीसा उकाडा जाणवत आहे. आज जळगावचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सियस इतके आहे. तसेच आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी पावसाचे चिन्हे दिसेनात. नाशिकमध्ये ही दोन दिवस येलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उद्या जळगाव, नाशिक अहिल्यानगर येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रात हलका अन् मध्यम पाऊस

तर धुळे, नंदुरबार जिल्ह्याला ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस म्हणजेच ८ ते १२ ऑगस्ट दरम्यान हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहे असा अंदाज आहे. तसेच जळगाव, नाशिकमध्ये १० ते १२ असा पुढील तीन दिवस हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे. तर ९ ऑगस्टला अहिल्यानगर मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित दिवसात हलक्या सरी कोसळतील.

९ ऑगस्ट रोजी ‘या’ ८ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

उद्या ९ ऑगस्ट रोजी या ८ जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे, त्यामध्ये जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश असून येथे मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज आहे. तर ३१ जिल्ह्यात ग्रीन अलर्ट असून येथे हलका व मध्यम सरी पडतील असा अंदाज आहे. ९ ऑगस्टला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे.

राज्यात तीन दिवस असे असेल हवामान

०९ ऑगस्टला कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भ व मराठवाड्यातील अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.

१० ऑगस्टला कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भातील अनेक ठिकाणी; मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.

११ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भातील अनेक ठिकाणी; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे.

हवामान विभागाचा इशारा

८ ऑगस्ट रोजी कोकण व गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे.

९ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे.

१० व ११ ऑगस्ट रोजी कोणताही इशारा दिलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment