Amalner News: तालुक्यातील खौशी येथे गुरुवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. तलावात मुलगा बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर पिता पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, अथक प्रयत्न करूनही वाचविण्यात यश आले.नसल्यानं लेकासह वडिलांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने खौशी गावावर शोककळा पसरली आहे. आण्णा एकनाथ तलवारे (३२) आणि मुलगा वीरेंद्र तलवारे अशी पिता-पुत्रांची नावे आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, तलावातील गाळात मुलगा फसल्याचे वडील आण्णा तलवारे यांच्या लक्षात आले. मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने पाण्यात उडी घेतली. मात्र, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ते स्वतःही गाळात फसले. त्यातून निघण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. पण, त्याना यश आले नाही, यात बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना तलावातून बाहेर काढले.

त्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणण्यात आले. अमळनेर तालुक्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.








