होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सर्दी-खोकला अन् घशात खवखव होतेय का; मग घरगुती काढा देईल आराम! घरातील मसाल्यापासून कसा बनवाल काढा ‘ते’ जाणून घ्या

On: August 10, 2026 12:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Home Remedy: पावसाळा सुरू झाला आहे. वातावरणात गारवा जाणवत आहे. पाण्याचे सेवन आणि जेवणातील काही बदल आपल्याला करावे लागतात. विशेषतः थंड पाणी किंवा थंड पदार्थ काही जणांना पावसाळी वातावरणात सूट होत नाही, त्यामुळे बऱ्याच लोकांना सर्दी, पडसे, घशातील खवखव, घसा दुखणे, किंवा घसा बसने अशा प्रकारच्या दुखण्यांना सामोरे जावे लागते.

आता या दुखण्यावर सोपा घरगुती उपाय देखील आहे, आपल्या किचनमध्ये काही मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून या छोट्या दुखण्यांपासून बरे होता येईल. पावसाळ्याचे हवामान शरीराला पोषक असले तरी गारवा असल्याने शरीराला उब देण्याची गरज भासते. आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले घ्या, त्यामध्ये एक छोटा दालचिनीचा तुकडा, थोडा गूळ, एक लवंग, चार ते पाच तुळशीचे पाने, तीन ते चार मिरी, वेलदोड्याचे दोन दाणे, चिमूटभर हळद, अद्रक एक छोटा तुकडा असे सर्व मसाल्याचे पदार्थ एका ताटात ठेवा.

त्यांनतर गॅस पेटवून त्यावर छोटे पातेले ठेवा. पातेल्यात दोन कप पाणी टाका आणि प्रथम पाणी थोडे गरम झाले की, त्यात आल्याचा छोटा तुकडा ठेचून टाका, मग त्यात वर सांगितल्याप्रमाणे तुळशीचे पाने, वेलदोड्याचे दाणे, दालचिनी तुकडा, मिरे, थोडा गूळ, लवंग, आदी टाकून थोडावेळ मंद आचेवर उकळी द्या, सर्व मसाले पाण्यात चांगले मिश्रित होऊ द्यावे, दोन कप पाण्याचे एक कप होईपर्यंत उकळी द्यावे, त्यानंतर पातेले गॅस वरून उतरून खाली ठेवावे. दोन मिनिटांनी तयार झालेला काढा गाळणीने घालून घ्यावा. आत काढा पिण्यासाठी तयार आहे. तो पिताना थोडी काळजी घ्यावी फार कडक घोट अन् पटापट घेऊ नये, एक एक घोट हळूहळू घ्यावे. घशाला लागलीच आराम मिळण्यास सुरवात होते. तसेच गारव्यात शरीराला ही चांगली उब मिळते.

पावसाळ्यात घेतला जाणारा हा काढा प्रत्येकाला सूट होईलच असे नाही, त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. काही वेळेस तज्ज्ञांचा सल्ला ही घ्यावा. याबाबत घरातील जेष्ठ मंडळीही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. तसे घरात जर आजी असेल तर तिच्या बटव्याचा पुरेपूर वापर करते. घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.

(टीप: ज्यांना दीर्घकालीन आजार आहेत किंवा नियमित औषधे सुरू आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच अशा घरगुती उपायांचा अवलंब करावा)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment