होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पथविक्रेत्यांना सन्मान द्या, स्मार्ट मीटरला हद्दपार करा: या मागण्यांसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन

On: August 31, 2026 4:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: अनेक फेरीवाले, पथविक्रेते रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला, फळे विकून आपला उदरनिर्वाह चालवत असतात. मात्र, त्यांच्यावर अतिक्रमण विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून नियमित कारवाई करून त्यांच्या मालाची नासधूस केली जाते. जप्त केलेला माल पथविक्रेत्याला परत द्यायला हवा असा कायदा असतानाही त्याची पायमल्ली होत आहे. त्याने पथविक्रेत्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून बदलापूर येथील विशाल दाते नामक २८ वर्षीय तरुणाला ट्रेनखाली झोकून देत आत्महत्या करावी लागली आहे. तरी प्रशासनाचे डोळे उघडत नसून प्रशासनाने ही कारवाई थांबवून पथविक्रेत्याला सन्मानजक व्यवसाय करू द्यावा व स्मार्ट मीटर हद्दपार करावे या मागण्यांसाठी जिल्हा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव शहराध्यक्ष श्रुषी भारसके, उपाध्यक्ष राकेश भोई,जळगाव तालुका अध्यक्ष रविंद्र मोरे,भारत मुक्ती मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष देवानंद निकम आदींच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण यांना निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा

१)अधिनियम २०१४ व महाराष्ट्र नियम २०१५ ची राज्यभर अमलबजावणी केली जावी.

२)ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झाले नसेल त्यांचे तात्काळ सर्वेक्षण करावे.

३) पथविक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करावे.

४)त्यांच्या घटनात्मक अधिकाराचे संरक्षण करून सन्मानजनक उपजीविका भागविण्याच्या हक्काचे रक्षण करावे इत्यादी मागण्या या निवेदनात नमूद केल्या आहेत.

५) पथविक्रेत्यांचा जप्त केलेला माल त्यांना परत करण्यात यावा.

६)पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

७)ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने स्मार्ट मीटर बसवु नये.

८) स्मार्ट मीटर व जुने डिजिटल मीटर समांतर मोजणीसाठी ६ महिने ठेवण्यात यावे.

९)प्रत्यक्ष रिडिंग न करता अंदाजे वीजबिल ग्राहकांना देऊ नये.

१०) दीर्घकाळ वीज खंडित झालेल्या कृषी व घरगुती ग्राहकांना नुकसान भरपाई देण्यात यावी.

पथविक्रेत्यांबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणते?

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देखील अनुच्छेद १९ (१) (ग) अंतर्गत व्यवसायाचा अधिकार मान्य केला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांना पथ विक्रेता कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची टीव्हीसी (TVC) ची स्थापना, सर्वेक्षण आणि योजना अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असतांना या सर्व गोष्टीची पूर्तता न करता उपरोक्त व्यावसायिकांना त्यांच्या सन्मानजनक रोजगारापासून वंचित केले जात आहे..हे महाराष्ट्रभर सर्रास घडत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती मोर्चाने केला आहे. या विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले असून त्याअंतर्गत दुसरे चरणातील धरणे आंदोलन करण्यात आले आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल देहडे व जिल्हा सचिव खुशाल सोनवणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

स्मार्ट मीटर सक्तीने नागरिक हैराण

विद्युत कायदा २००३ मधील कलम ५५(१) अन्वये ग्राहकांना योग्य मीटरद्वारे वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. कलम १७७ (ग)(२) अन्वये केंद्री विद्युत प्राधिकरणास नियम बनविण्याचा अधिकार आहे .परंतु सर्वच ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक आहे. असा उल्लेख कुठेच नसताना विद्युत प्राधिकरणाचे कर्मचारी बळजबरीने हे स्मार्ट मीटर घेण्याची सक्ती करत आहेत. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना वीजेची अवाजवी बिले येत आहे. ही बिले न भरल्यामुळे मुंबई कार्यालयातून परस्पर वीज कनेक्शन बंद केले जात असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या विरोधात बहुजन मुक्ती मोर्चाने स्मार्ट मीटर विरोध भूमिका घेतली असून बळजबरीने मीटर बसवू नये, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दीर्घकाळ वीज खंडित झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई दया

या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य प्रभारी सुमित्र अहिरे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे प्रा.एन.व्ही.भारंबे,डॉ.मच्छिंद्र पाटील,अमोल कोल्हे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे डॉ शाकीर शेख,अकीलभाई कासार,अकील पहेलवान,पथविक्रेते प्रशांत सोनवणे, विनायक वाणी,संतोष पाटील,ज्योती पाटील,प्रमिला राठोड,किरण चौधरी, मंदा गोपाळ, रुपाली पाटील, आदि बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी व पथविक्रेते उपस्थित होते. यापुढील आंदोलन हे मंत्रालयावर लाखो पथविक्रेत्यांचा विशाल महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी सुमित्र अहिरे व बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment