दिगंबर मराठे
Water Dam Level: अल निनोचा परिणाम यंदा जाणवेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता, असे असले तरी राज्यातील धरण प्रकल्पात पाणीसाठा बरा आहे. आता जळगावला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे. अद्यापही मुसळधार पावसाची गरज आहे. जळगावची मुख्य जीवनवाहिनी असलेल्या हतनूर आणि वाघूर धरणात पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Waghur) वाघूर धरणात यंदा आजचा पाणीसाठा हा ७०.६० टक्के इतका असून गतवर्षी तो ६५.२१ टक्के इतका होता. त्यात ५.३९ टक्के वाढ झाली आहे. तर (Hatnur) हतनूर धरणात ३७.४१ टक्के पाणीसाठा झाला असून गतवर्षी तो २७.८० टक्के होता, त्यामध्ये ९.६१ टक्क्याची वाढ दिसत असली तरी, यंदा हतनूरची पाणी पातळी कमीच असून, भुसावळकरांना यंदा पाणी जपून वापरावे लागणार आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची गरज आहे. जेणे करून वर्षभर पाणी पुरवठा करणे शक्य होईल. मात्र, जळगावकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
राज्यातील धरणसाठा टक्केवारी
राज्यातील धरण प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्या किंचित घट दिसत आहे. मात्र, येत्या काही दिवसात पाऊस झाल्यास ती भरून निघेल असे, जाणकारांना वाटते. मात्र, ती इतकी चिंताजनक नसून केवळ २.४६ टक्के इतकी आहे. राज्यातील १३८ मोठ्या धरण प्रकल्पात ७८.५१ टक्के पाणीसाठा आहे गतवर्षी त्यात ७९.४२ टक्के होता. २६४ मध्यम प्रकल्पात ५४ टक्के पाणीसाठा आहे, तर गतवर्षी तो ६१.२५ इतका होता. तसेच २६२७ लहान(लघू) प्रकल्पामध्ये केवळ ३६ टक्केच पाणीसाठा आहे. गतवर्षी तो ४२.३३ टक्के इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत राज्यातील सर्वच धरण प्रकल्पातीळ पाणी साठ्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. अल निनोचा हा परिणाम असू शकतो ससे तज्ज्ञांना वाटते.
राज्यातील धरणात २.४६ टक्क्यांची घट
राज्यात नाशिक, पुणे कोकण भागात जोरदार पाऊस झाला आहे. याठिकाणी धरणे ७० टक्क्याच्या वर भरली आहे. तर इतर धरणात ४४ ते ५८ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. राज्यातील काही भागात अद्याप दमदार पाऊस झालेला नसून पाण्याच्या साठ्यात घट होतांना दिसून येत आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने दैनंदिन पाणीसाठ्याची आकडेवारी जारी केली आहे. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या राज्यातील सर्व धरण प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मागील वर्षेच्या तुलनेत किंचित २.४६ टक्क्याची घटले आहे. ही आकडेवारी फारशी चिंताजनकबाब नाही.

राज्यात एकूण मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प, असे एकूण ३०२९ धरणे आहेत. धरण प्रकल्पात एकूण ४८५५३.६४ (द.ल.घ.मी) इतका तर उपयुक्त पाणीसाठा ४०७८६.१३ इतका आहे. तर त्यामध्ये एकूण ३५८४९.८५ आजचा साठा (द.ल.घ.मी) आजचा उपयुक्त जलसाठा २८१०४.९२ (द.ल.घ.मी) आहे. म्हणजेच सर्व धरणात यंदा ६८.९१ टक्के पाणीसाठा आहे. तर, गतवर्षी आजच्या दिवशी पाणीसाठा हा ७१.३७ टक्के इतका होता. त्यामुळे राज्यातील धरण प्रकल्पात पाण्याची घट २.४६ टक्के दिसून येत आहे. जलसंपदाच्या दैनंदिन आकडेवारी वरून परिस्थिती फारशी चिंताजनक दिसून येत नाही. परंतु पावसाची गरज कायम आहे..
गंगापूर धरण भरले
नाशिकमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसाने नाशिकरांची चिंता मिटली आहे. नाशिक जिल्ह्यातीळ शहराची जीवनवाहिनी असलेल्या गंगापूर धरणात आज ८६.६८ टक्के पाणीसाठा असून गतवर्षी तो ८०.९९ टक्के इतका होता. यंदा त्यात वाढ झाली असून ती ५.६९ टक्के इतकी आहे. सद्या पाऊस समाधानकारक पडलं असला तरी काही धरण क्षेत्रात पाऊस झाला नाही, तर पाण्याची परिस्थिती बिकट होईल, असे सध्या दिसत आहे.










