होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध, शासनाला दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम

On: August 23, 2026 7:30 PM
Follow Us:
---Advertisement---

FDA In Action: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढें यांनी कारवाईची व्याप्ती वाढवली असून आता आपला मोर्चा खाद्य तेलाकडे वळवला आहे. सुट्टे तेल विकू नका आणि ग्राहकांनी घेऊ नये, असे आदेश मुंडे यांनी दिले आहे. त्याने व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. नुकतीच व्यापाऱ्यांची एक बैठक झाली आहे. या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तसेच राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

आज नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. तुकाराम मुंडे यांच्या सुट्टे खाद्यतेल विक्री बंदी निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेत केंद्र सरकारकडे ही पाठपुरावा करणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. दहा लाख रुपये दंड आणि कारावास अन्यायकारक असून आम्ही अतिरेकी आहोत का? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी केला आहे.

नियम तोडल्यास अशी असेल शिक्षा

दरम्यान, खाद्यतेलाच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन केलं तर ७ वर्षांपासून आजन्म शिक्षा आहे. तर, भेसळ केल्यास दहा लाखापर्यत दंड आहे, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर ही दहा लाखापर्यत दंड आहे, असे मुंढे म्हणाले होते. सुट्टे तेल विकत घेऊ नका, पॅकेज तेल आहे तर लेबल बघा, सील बंद आहे का ते बघा, त्याची मुदत बघा, तळलेले तेल वारंवार घरी ही वापरू नका आणि हॉटेलमध्ये देखील वापरलं जात असेल तर तिथे खाऊ नका, अशी माहिती देखील तुकाराम मुंढे यांनी दिली होती. आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम परिणाम होतात, मेंदू विकार, कर्करोग, उच्च रक्तदाब असे आजार बळवतात, ते आरोग्याशी खेळणारे भेसळयुक्त तेल आहे, असे मुंढे म्हणाले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment