होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

डांभुर्णी येथे भर चौकात गोळीबार; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या! आरोपी निघाला सरपंच..

On: August 28, 2026 6:32 PM
Follow Us:
---Advertisement---

Yawal News: गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी येथील विद्यमान सरपंचाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. डांभुर्णी येथे भर चौकात ही घटना घडली असून ३७ वर्षीय विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके यास अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीकडून पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास डांभुर्णी येथे एका व्यक्तीने गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली. या घटनेची माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना समजताच तपासाला गती दिली. त्यांनतर पोलीस निरीक्षक धारबळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल अनिल साळुंखे व हितेश बागुल आदीच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे

घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. यावेळी किनगाव रोडलगत असलेल्या शिवसम्राट सोयाबिन बिर्याणी शॉपजवळ गोळीबारातील एका राऊंडची रिकामी पुंगळी पोलिसांना दिसली. परिसरातील व्यावसायिकांकडे चौकशी केली असता विकास जगन्नाथ सोळंके याने त्याठिकाणी फायरींग केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी बोलावून रिकामी पुंगळी तसेच इतर महत्तवाचे पुरावे जप्त करण्यात आले.

आरोपीला केली अटक

घटनेनंतर आरोपी जळगावच्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यांनतर पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील यांना जळगावच्या दिशेने आरोपीच्या मागावर पाठवण्यात आले. त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या पथकानेही आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. संयुक्त शोध मोहिमेदरम्यान विकास उर्फ गोटू सोळंके याला रात्री सुमारे एक वाजता जळगाव शहरातील कालंका माता मंदिर परिसरातून ताब्यात घेतले. त्याला यावल पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेचे कारण काय?

पोलिसांच्या चौकशीत आरोपी हा कोळन्हावी ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच असल्याचे समोर आले. त्याचे कोळन्हावी परिसरात आदर्श हॉटेल, बिअर बार आणि परमिट रूम असल्याची माहिती पोलिसांनी दिली. डांभुर्णी येथील काही तरुण त्याच्या हॉटेल व बिअर बारमध्ये येऊन मोबाईलवर व्हिडीओ काढत असल्याने त्यांना तो त्रास देत असल्याचे सांगण्यात आले. याच कारणावरून २६ ऑगस्ट रोजी संबंधित तरुणांसोबत आरोपीचे भांडण झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने २७ ऑगस्ट रोजी रात्री डांभुर्णी येथे जाऊन हवेत गोळीबार केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत राऊंड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे..

याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सहा,नि हेमंत सांगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, हितेश बागुल, सचिन पाटील, अनिल साळुंखे, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment