होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ladaki Bahin Yojana : बोगस लाभार्थ्यांना दणका! लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांना वगळले, अपात्र लाभार्थ्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा देखील होता समावेश

On: August 19, 2026 2:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अपात्र लाभार्थ्यांना दणका ठरणारी ही बातमी असून लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे तब्बल साडेचार लाखांहून अधीक सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून या योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र लाभार्थी कमी केल्याने सरकारचा आर्थिक भार कमी झाला आहे.

महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा आवाका मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. राज्य शासनाद्वारे राबवण्यात आलेल्या संपूर्ण पडताळणी आणि ई-केवायसी (e-KYC) मोहिमेनंतर आपात्र लाभार्थी कमी करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे सक्रिय लाभार्थी महिलांची संख्या जवळपास 2.48 कोटींवरून घसरून थेट 1.65 कोटीवर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या आरटीआयमधून ही आकडेवारी समोर आली आहे.

दरम्यान, हजारो अपात्र शासकीय कर्मचारी कुटुंबांकडून बेकायदेशीरपणे लाटलेले पैशांची वसुली करण्याची अधिकृत यंत्रणा अद्याप ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे. आरटीआयमधून वसुलीची आकडेवारी प्राप्त झालेली नाही, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दिली आहे. तर ईकेवायसी पूर्ण न झाल्याने दुर्गम भागातल्या गरीब महिला अजूनही योजनेपासून वंचित असल्याचा दावाही आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment