होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राष्ट्रीय महामार्गावर ५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकास अटक; धरणगाव पोलिसांची कारवाई

On: July 25, 2026 2:27 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगावमध्ये सातत्याने प्रतिबंधित गुटखा माफियांवर कारवाई केले जात आहे. शुक्रवारी वरणगाव पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गवर मोठी कारवाई करून प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ असा सुमारे ५.१७ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील कपिलवस्ती जवळ, मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचण्यात आला. दि. २५ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी एका संशयित  वाहनाची तपासणी केली असता, महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा, विमल पानमसाला, तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

या प्रकरणी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. खालची आळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी विविध कंपन्यांचा गुटखा, विमल पानमसाला, तंबाखू, केसी ब्रँड तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार (एमएच-२० बीडी-३०००) जप्त केली. जप्त केलेल्या वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत ₹५,१७,८६८ इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमितकुमार बागुल, पोलीस उपनिरीक्षक एस. के. बेंडकोळी, तसेच वरणगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. के. बेंडकोळी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment