होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ladki Bahin Yojana July Payment : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! रक्षाबंधनाची भेट, जुलै महिन्याचा निधी खात्यात जमा

On: August 26, 2026 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---

Ladki Bahin Yojana July Payment : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. योजनेचा जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होईल, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

 

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

पैसे जमा होत नसतील तर ई-केवायसी कशी करावी?

 

दरम्यान, काही लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप सन्मान निधी जमा झालेला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक आहे का, तसेच योजनेचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ई-केवायसीची स्थिती तपासावी. ई-केवायसी अपूर्ण असल्यास पुढीलप्रमाणे प्रक्रिया करता येईल.

 

– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला क्लिक करा.

 

– त्यानंतर ‘ई-केवायसी’ किंवा संबंधित पर्यायावर क्लिक करा.

 

– आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा भरून पुढील प्रक्रिया सुरू करा.

 

– आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी नोंदवा.

 

– स्क्रीनवर विचारण्यात आलेली आवश्यक माहिती भरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

 

– ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्याची स्थिती पुन्हा तपासा.

 

– बँक खाते आधारशी संलग्न नसल्यास संबंधित बँकेशी संपर्क साधून आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

 

ई-केवायसी पूर्ण असूनही पैसे जमा होत नसतील, तर लाभार्थी महिलेने योजनेच्या पोर्टलवर अर्जाची स्थिती तपासावी. बँक खाते सक्रिय आहे का, आधार लिंक आहे का आणि खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) सुरू आहे का, याचीही खात्री करणे महत्त्वाचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येणार याचे नियोजन सुरू: एकनाथ शिंदे

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

Leave a Comment