Jalgaon News: जळगावमध्ये शुक्रवार आणि शनिवारी धुव्वाधार पाऊस झाला. मात्र, आज सकाळपासून ऊन पडले आहे. अधून-मधून हलका पाऊस आहे. मात्र, मुसळधार पावासाने विश्रांती घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात १ ते ५ ऑगस्ट दरम्यान हलका पाऊस सांगितला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या जिल्ह्यात ही ग्रीन अलर्ट आहे. येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसाने पाच दिवस विश्रांतीचे संकेत दिल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे उरकण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे.
३ ऑगस्ट रोजी सहा जिल्ह्याना येलो अलर्ट
दरम्यान रत्नागिरी, सातारा घाट, अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, या सातारा घाटमाथा परिसरासह ६ ठिकाणी उद्या ३ ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आला आहे. याठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर बाकी जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट जारी करण्या आला असून हलका-मध्यम पाऊस बरसेल. त्यामुळे आता काही ठिकाणी ऊन पावसाचा खेळ बघायला मिळत आहे.

२ ते ५ ऑगस्ट दरम्यान असे असेल हवामान
०२ ते ३ ऑगस्टला कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी; तसेच मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.
०४ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भातील काही ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.
०५ ऑगस्ट रोजी कोकण आणि गोव्यातील बहुतांश ठिकाणी; विदर्भातील अनेक ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता.
मुंबई हवामान विभागाचा इशारा:
०२ ते ३ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता. विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता.
०४ ते ५ ऑगस्ट रोजी विदर्भातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता.










