होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

‘मास्टर की’च्या सहाय्याने मोटारसायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद!

On: July 27, 2026 5:12 PM
Follow Us:
---Advertisement---

Pachora News: पाचोरा पोलिसांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत मास्टर कीच्या सहाय्याने मोटारसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या चार बजाज प्लॅटिना मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख २० रु. हजार इतकी आहे. आरोपीचा आणखी काही गुन्ह्यात हात आहे का याचा तपास पोलीस करत आहे.

पोलिसांनी सापळा रचून आरोपी ताब्यात

जळगाव जिल्ह्यासह पाचोरा शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वाहनचोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने तपास सुरू ठेवला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अमोल राजेंद्र बमाळे (वय २७, रा. नंदीचे खेडगाव, ता. पाचोरा, सध्या रा. काळे नगर, जळगाव) हा जळगाव रोडलगत शेतातील शेडमध्ये लपून राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी मास्टर कीच्या सहाय्याने बजाज प्लॅटिना मोटारसायकली चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

चार मोटारसायकली जप्त

जप्त करण्यात आलेल्या चारही मोटारसायकली भडगाव, पाचोरा व एमआयडीसी वाळूज (छत्रपती संभाजीनगर) पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत दाखल गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ तसेच गुन्हे पथकातील विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, उमेश पाटील, योगेश पाटील, संदीप पाटील आणि हरीश परदेशी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment