होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

‘SIR’ कार्यक्रमाअंतर्गत १७ ऑगस्टला प्रारूप मतदारयादी होणार प्रसिद्ध; अर्जाची मुदत ८ ऑगस्ट

On: July 28, 2026 12:13 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत गणना अर्ज भरून त्यावर स्वाक्षरी करून गृहभेटीस येणाऱ्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. वेळेत गणना अर्ज भरून सादर करणाऱ्या मतदारांची नावे १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.

नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ भरा

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना क्रमांक ६ (आवश्यक घोषणापत्र व कागदपत्रांसह) भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करतील. दावे व हरकतीच्या या कालावधीत मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६, नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ भरता येणार आहे. तसेच संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना ७ भरून हरकत नोंदवू शकतो.

खोटी माहिती दिल्यास शिक्षेची तरतूद

मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा अथवा खोटी माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर रोजी

राज्यातील अंतिम मतदार यादी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २२ व २३ नुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही पात्र नागरिकांना नाव समाविष्ट करणे किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुना क्रमांक ६ द्वारे अर्ज करता येणार आहे. मतदार यादीचे अद्ययावतीकरण ही निरंतर प्रक्रिया असून, कोणत्याही निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत अशा सुधारणा करता येतात, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने (Chief Election Commision Office) प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment