होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली; गंगापूर ‘इतके’ टक्के भरले, महापौरांनी गंगापूर धरणावर केले जलपूजन

On: July 28, 2026 4:24 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिकमध्ये घाटमाथा परिसरसह शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीवर मोठी वाढ झाले असून जलसाठा ८३.९७ टक्के झाला आहे. त्याने नाशिककरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने गंगापूर धरणावर जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गंगापूर धरणावर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या शुभहस्ते व स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, गटनेते श्याम बडोदे,अजय बोरस्ते,गटनेत्या सीमा ठाकरे, गटनेते केशव पोरजे, भाजपा नेते लक्ष्मण सावजी,अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,प्रभाग सभापती सुरेश पाटील,समाधान देवरे,नगरसेवक भगवान दोंदे, निवृत्ती इंगोले,प्रवीण जाधव,बाळासाहेब निगळ, नगरसेविका अंकिता शिंदे यांचे सह मनपा नगरसेवक पदाधिकारी यांचे उपस्थितीत विधिवत पूजा करून जलपूजन करण्यात आले.

पूजेचे पौराहित्य राहुल बेळे यांनी केले.या वेळी उपस्थितांनी श्रीफळ अर्पण केले. यावेळी जलपूजन कार्यक्रमास शहर अभियंता संजय अग्रवाल,अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, अविनाश धनाईत,कार्यकारी अभियंता बाजीराव माळी ,संजय आडेसरा,कार्यकारी अभियंता गणेश मैड, शैलेंद्र जाधव, नवनीत भामरे,सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे,नगरसचिव संजय नेरकर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जलपूजन म्हणजे गोदामाई अन् धरणाचा सन्मान: महापौर

जलपूजन ही एक संस्कृती असून त्यातून आपण गोदामाईचे व धरणाचा सन्मान करीत असतो हे गोदामाई व धरण आपली पाण्याची गरज पूर्ण करते त्याप्रती आदर व कृतज्ञता या माध्यमातून व्यक्त करतो. जलपूजन हा एक सोहळा असून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या वतीने येणारा आगामी सिंहस्थ कुंभ पर्व निर्वीघ्नपणे पार पाडावे यंदाचा कुंभमेळा पुढच्या पंचवीस वर्षाची मुहूर्तमेढ ठरणार असून त्यानिमित्ताने नाशिकची उत्तरोत्तर प्रगती होत राहील असा विश्वास महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी व्यक्त केला.

जल हे आपल्या जीवनाचा मोठा आश्रय: आयुक्त

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आज गोदामाई व धरणाची पूजन केलेले असून जल हे आपल्या जीवनाचा एक मोठा आश्रय आहे. देवाच्या कृपादृष्टीमुळे धरणात चांगला जलसाठा झाला असून, त्यामुळे आपण नाशिककरांना पाणी देऊ शकणार आहोत.पुढील वर्षात आपण कुंभमेळा उत्तमरीत्या करणार असून पुढील वर्षी देखील जलसाठा उपलब्ध राहील, असा विश्वास मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment