New Delhi: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे की, भारताची उदारता आणि सहिष्णुता याला कमजोरी समजू नये.असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे हे ऑपरेशन सिंदूरचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी यावरही जोर दिला की, परिणामांची पर्वा न करता धोका पत्करण्याची आणि जोरदार प्रहार करण्याची क्षमता देशात आहे. असा इशारा ही दिला.
ऑपरेशन सिंदूरची गरज का?
दरम्यान डिस्कव्हरीच्या आगामी माहितीपट मालिका, “डीक्लासिफाइड: ऑपरेशन सिंदूर” साठी दिलेल्या मुलाखतीत डोवाल यांनी सांगितले की, या ८८ तासांच्या लष्करी कारवाईचा उद्देश शत्रूच्या दहशतवाद्यांचे तळ, विशेषतः पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणे हा होता. ऑपरेशन सिंदूरनंतरच्या आपल्या पहिल्या मुलाखतीत डोवाल म्हणाले, “शत्रूचे तळ, विशेषतः पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांचे तळ उद्ध्वस्त करणे, हे आम्ही या कारवाईचे उद्दिष्ट ठेवले होते.” असे एका वृत्त संस्थने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

‘डीक्लासिफाइड: ऑपरेशन सिंदूर’ शनिवारी रात्री ९ वाजता
डिस्कव्हरीने एका निवेदनात म्हटले आहे की, ही दोन भागांची माहितीपट मालिका ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संदर्भातील निर्णय आणि घटना उलगडण्यासाठी भारताचे लष्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा नेतृत्व एकत्र आणते. यामध्ये भारताच्या प्रतिसादावर देखरेख करणाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचा समावेश आहे. डिस्कव्हरीच्या मते, या शोमध्ये अजित डोवाल लष्करी प्रतिसादामागील निर्णय आणि तो अंमलात आणण्याच्या निर्धारावर सविस्तर माहिती देतील. “डीक्लासिफाइड: ऑपरेशन सिंदूर” चा प्रीमियर शनिवारी रात्री ९ वाजता डिस्कव्हरी चॅनल आणि डिस्कव्हरी प्लस या स्ट्रीमिंग सेवेवर होईल.
ऑपरेशन सिंदूर कधी झाले
ऑपरेशन सिंदूर गेल्या वर्षी ७ मे रोजी सकाळी सुरू करण्यात आले होते. २२ एप्रिल रोजी झालेल्या प्राणघातक पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देणे हा त्याचा उद्देश होता. या ऑपरेशनअंतर्गत, भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील अनेक दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. त्यानंतर, पाकिस्ताननेही भारतावर हल्ले केले. भारताचे प्रत्युत्तरात्मक हल्ले ‘ऑपरेशन सिंदूर’चा भाग होते. या दोन अण्वस्त्रधारी शेजारी देशांमधील लष्करी संघर्ष सुमारे ८८ तास चालला. हे युद्ध १० मे रोजी संध्याकाळी दोन्ही बाजूंमध्ये करार झाल्यानंतर लष्करी कारवाई थांबली. त्यामध्ये भारताने पाकिस्तानला मोठा झटका दिला होता.









