Cockroch Janta Party: नीट पेपरफुटी मुद्द्यांवरुन जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीने बेमुदत आंदोलन केल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी केंद्र सरकारच्यावतीने सीजेपीला काही आश्वासनं देण्यात आली होती. आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचंही आश्वासन देण्यात आलं. तसेच नीटच्या पीडित कुटुंबियांना आर्थिक मदतीचे आश्वासनाचा समावेश असून ही आश्वासने सरकारने पाळली नसल्याचे सांगत सीजेपी पुन्हा एकदा इंडिया गेटवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सीजेपीचे अभिजीत दिपकेंनी यांनी स्कुल ठीक करो अभियान सुरू केलं आहे. शासकीय शाळांच्या दूरावसंस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. आता सीजेपीने ५ सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात विद्यार्थी, युवा संघटना आणि देशभरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सरकारने आश्वासने पाळली नाही
जंतरमंतरवरील आदोलनानंतर सीजेपी पुन्हा आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे. सीजेपीकडून ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत शांततापूर्ण मोर्चाची घोषणा करण्यात आली असून २५ जुलैला सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचे सीजेपीने म्हटलं आहे. त्यामुळे आता इंडिया गेटपासून नवी दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत कॉकरोच जनता पार्टीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. नीट पीडितांच्या कुटुंबीयांसह पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या, पोलीस अत्याचाराचे पीडित कुटुंबीय या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. १८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने एफआयआरची यादी मागूनही सरकारने स्पष्ट आश्वासन दिले नसल्याचा दावा सीजेपीने केला आहे. सरकारने विद्यार्थ्यांना आणि सीजेपीच्या शिष्टमंडळाला दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी कॉकरोच जनता पार्टीने केली आहे.

सरकारने एफआयआरची यादी दिली नाही
केंद्र सरकारने एफआयआरची यादी देण्याचे स्पष्ट आश्वासन दिलेले नाही, असा सीजेपीचा आरोप आहे. आंदोलन संपण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांवरून सरकारने माघार घेतल्याचे हे लक्षण आहे, असे सीजेपीचे म्हणणे आहे. त्यामुळे सीजेपी नेते सौरभ दास आणि रत्ना सिंह यांनी सांगितले की, आंदोलन संपल्यानंतर सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. सर्व एफआयआर मागे घ्यावेत आणि शांततापूर्ण आंदोलकांवरील कारवाई थांबवावी.









