होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

ICU जळीत प्रकरण: जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची नव्याने करणार उभारणी: चंद्रशेखर बावनकुळे

On: September 1, 2026 12:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Amaravati News: जिल्हा स्त्री रुग्णालयातील २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील बाधित बालकांची महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. त्यांनी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी) तसेच मुरके हॉस्पिटलला भेट देऊन उपचारधीन बालकांच्या आरोग्याची माहिती घेतली, तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त नवजात अतिदक्षता विभागाची पाहणी केली. जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीमध्ये ३ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याठिकाणचा अतिदक्षता विभाग हा गरजूंसाठी महत्त्वाचा असल्याने अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली

पीडीएमसी आणि मुरके रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही नवजात बालकांची प्रकृती धोक्याबाहेर आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित बालकांवर विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पालकमंत्री बावनकुळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बालकांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच, उपचाराधीन बालकांच्या माता-पित्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत “राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास दिला.

त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी करून प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनेच्यावेळी जीवाची बाजी लावून नवजात बालकांना अतिदक्षता विभागातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या परिचारकांशी त्यांनी चर्चा केली व माहिती जाणून घेतली. यावेळी रुग्णालयातील सुरक्षितता आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त राकेश ओला आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment