Jalgaon News: दिल्लीत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याठिकाणी सुरू असलेल्या पोलिसांच्या दडपशाही विरोधात राज्यातील सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. जळगाव शहरात ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा कडून बंदला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातून मोर्चा काढण्यात आला होता. त्यात पदाधिकारी- कार्यकर्ते सहभागी झाली होते. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
दिल्लीत सुरू असलेल्या नीट परिक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जने अनेक विद्यार्थी जखमी झाले. सद्या जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच असून आदोलनाला महाराष्ट्रातून देखील पाठींबा मिळत आहे. शांततामय मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रात उमटत आहे. विरोधकांनी सरकार विरोधात आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या दडपशाही विरोधात राज्यातील सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. जळगाव शहरात ही वंचित बहुजन आघाडीसह समविचारी पक्ष आदींच्या वतीने मोर्चा काढून बंदला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. याप्रसंगी शहरातून मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा मुख्य रस्त्यावरून गोलाणी मार्केट येथे आल्यावर परिसरात व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. तसेच शहरात विविध भागून मोर्चात कार्यकर्ते सहभागी झाले होते. याप्रसंगी महिला तालुका अध्यक्ष किरण शर्मा, संघटक यशवंत सोनावणे, राजेश इंगळे, आर एन वानखेडे, सुनीता वानखेडे, ज्योती दाभाडे, जयपाल धुरंधर आदींसह कार्यकतें सहभागी झाले.








