होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी: भाजपा मुक्ताईनगर तालुक्याचा मोर्चा

On: August 3, 2026 6:01 PM
Follow Us:
---Advertisement---

Muktainagar News: भाजपा नेत्या तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्याचा निषेध व्यक्त करत भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार आणि मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले की, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक व बदनामीकारक भाषा वापरल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य हे केवळ एका लोकप्रतिनिधीचा अपमान नसून सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानावर घाला घालणारे आहे त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघासह राज्यातील लाखो नागरिकांच्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याविषयी करण्यात आलेल्या अशोभनीय वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. अशा विकृत व समाजविघातक प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे.

यावेळी भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, भाजपा जिल्हा सदस्य चंद्रकांत भोलाणे, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख ललित महाजन, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेविका माधुरी सचिन पाटील,भाजपा तालुका उपाध्यक्ष कैलास वंजारी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विशाल झाल्टे, नगरसेविका साधना बापु ससाणे, नगरसेवक नईम बागवान, कुऱ्हा भाजपा शहराध्यक्ष सागर गंगतीरे ,सुनीता भालेराव, भावना महाजन, वैशाली मनोज जाधव, शितल लक्ष्मन सापधरे, इंद्रायनी प्रकाश भोई, अनुराधा योगेश चौधरी, सालबर्डी माजी सरपंच तृप्ती तुषार राणे, स्वाती पंकज भारंबे, कोथळी सरपंच नारायण चौधरी, प्रशांत महाजन, बापु ससाणे, लक्ष्मण सापधरे, बाळा चिंचोले, दत्ता जोगी, माजी सरचिटणीस अंकुश चौधरी, पंकज पाटील, पंकज सरोदे, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मयूर महाजन, सोपान झाल्टे , जुबेर अली, अनिस पटेल, विनायक पाटील, अतिक खान, जावेद खान, प्रशांत जंगले, उमेश राणे, योगेश चौधरी, ललित खडसे, जानकीराम पांडे, सुनिल श्रीखंडे, विजय शिरोळे, सोमनाथ पाटील, योगेश मनसुटे, सार्थक पाटील, जयेश कारले, लखीचंद जैन, ज्ञानेश्वर ढोले, प्रदीप गोंधळी , रायसिंग चव्हाण, संदीप पाटील शालिग्राम सोनवणे, दलपत भोई, विनोद चौधरी, देविदास दांडगे, सोपान धाडे, निलेश दैवे, राहील खान, सौरव सपकाळे आदी भारतीय जनता पार्टी मुक्ताईनगर तालुक्याचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आघाडी-सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment