Latest Weather News: राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यात ७ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे, त्यामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ यांचा समावेश असून याठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा हवामान केंद्राने दिला आहे. उर्वरित ठिकाणी ग्रीन अलर्ट आहे. त्यामुळे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे.
जळगावात पुढील ३ दिवस हलका पाऊस
जळगावमध्ये ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान ग्रीन अलर्ट दिला असून हलक्या सरी आणि वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता फार कमी आहे. ५ ते ८ ऑगस्ट दरम्यानच्या दोन दिवसात हलक्या सरी बरसतील, असा अंदाज आहे. त्यामुळे ऊन आणि हलक्या सरीचा खेळ पुढील काही दिवस चालेल. ८ ऑगस्टननंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. पाऊस लांबला तर शेतीसाठी आणि काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच पावसाने एक आठवड्यापासून विश्रांती घेतली आहे. दरम्यान जळगावच्या तापमानात वाढ होणार आहे. साधारण तापमानात २-३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. आजचे तापमान ३१ अंश सेल्सियस आहे. पुढील काही दिवसात ते ३३ अंश असेल्सियसपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
उद्या ही हलका पाऊस
दरम्यान जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर या भागात ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान ग्रीन अलर्ट दिला आहे. येथे हलक्या आणि माध्यम सरी बरसतील असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या उत्तर महाराष्ट्राच्या या परिसरात पेरण्यांना वेग आला आहे. परंतु पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही’

तापमानात होणार वाढ
५ ऑगस्ट रोजी कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, तसेच मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात कमाल तापमानात २-३ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल. किमान पुढील ४-५ दिवसांत महाराष्ट्र परिसरात किमान तापमानात मोठा बदल होणार नाही.










